IMPIMP

Maharashtra Politics News | काका मला वाचवा म्हणायची अजित पवारांवर वेळ आली, शिंदे गटाच्या खासदाराची टीका

by nagesh
Maharashtra Politics News | shivsena mp shrikant eknath shinde slams ajit pawar and his condition in ncp

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | महाविकास आघाडीची वज्रमूठ (Vajramuth Sabha) राहणार की नाही? हे पाहावे लागेल असं म्हणत शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी मविआवर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते इतके दिवस सरकारवर टीका करत होते. मात्र आता ते एकमेकांवर टीका करत आहेत. हे सरकार कुठल्या विचारांनी नाही तर सत्तेसाठी (Maharashtra Politics News) खुर्चीवर आले होते, असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही टीका केली.

 

अजित पवार यांची ओळख ही काकांमुळे आहे. दोन दिवस आधी परिस्थिती पाहिली आहे. अजित पवारांना वाटलं शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यानंतर मलाच राष्ट्रीय अध्यक्ष करतील. पण तसं काय घडलं नाही हे आपण पाहिलं. त्यामुळे काका मला वाचवा हे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे (Maharashtra Politics News) यांनी केली. अशा लोकांनी मुख्यमंत्र्यांना कोण ओळखतं अशी टीका करु नये, असंही ते म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, आमचं सरकार अनेक वर्षे टिकणार आहे.
त्यामुळे कुणाला पर्यायी जॉब पाहिजे असेल तर भविष्य वर्तवण्याचं काम नाना पटोले (Nana Patole) यांनी करावं,
असा टोला त्यांनी लगावला. आमचं सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

श्रीकांत शिंदे म्हणाले, कॉन्ट्रॅक्टरची भाषा काही लोक करत आहेत. सोन्याचा चमचा घेऊन काही लोकं आले आहेत.
त्यांना बरोबर रेट माहित आहे. कॉन्ट्रॅक्टरची भाषा त्यांना माहिती आहे, कारण 25 वर्षे त्यांनी तेच केले आहे.
मला अजून उलगडायला लावू नका, असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray)
यांना दिला.

 

 

Web Title :-  Maharashtra Politics News | shivsena mp shrikant eknath shinde slams ajit pawar and his condition in ncp

 

हे देखील वाचा :

Aryan Khan Drug Case | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा दुसरा विजय

MP Shrikant Shinde | ‘मला अजून उलगडायला लावू नका…’; श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना इशारा (व्हिडिओ)

Related Posts