IMPIMP

Pune Crime News | १४ वर्षाच्या मुलाला पळवून नेऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चालकाला अटक; घरातील पैसे गुपचूप आणण्यास पाडले होते भाग

by nagesh
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | शेजारच्याकडील कारवर चालक म्हणून असलेल्याने १४ वर्षाच्या मुलाला मी खूप मोठा गुंड आहे. आताच जेलमधून बाहेर आलो आहे. तुला पळवून नेऊन जीवे ठार मारेन, अशी धमकी (Threat) देऊन घरातून गुपचूप पैसे आणून देण्यास लावण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Pune Police) सागर श्रवण पवार (वय २८, रा. राजीव गांधीनगर, एस पी कॉलेज) याला अटक (Arrest) केली आहे. याबाबत सॅलेसबरी पार्क येथे राहणार्‍या एका ३८ वर्षाच्या नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९/१२) दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणार्‍या सोसायटीतील एकाकडे सागर पवार हा चालक म्हणून कामाला होता. त्यातून त्याने फिर्यादी यांच्या १४ वर्षाच्या मुलासोबत ओळख करुन घेतली.
त्याला त्याने मी खूप मोठा गुंड आहे. आताच जेलमधून बाहेर आलेलो आहे.
तू जर तुमच्या घरातील पैसे गुपचुप आणून नाही दिले तर तुला पळवून घेऊन जाऊन जीवे ठार मारुन टाकेल,
अशी सतत धमकी देत. त्याला घाबरुन फिर्यादी यांच्या मुलाने त्याला घरातील ४५ हजार रुपये आणून दिले होते.
त्यानंतर १० फेब्रुवारी ला रात्री दहा वाजता फिर्यादीचा मुलगा पार्किंगमध्ये खेळत होता.
त्यावेळी पवार याने त्याला पुन्हा धमकी देऊन घरातून कुणालाही न सांगता २५ हजार रुपये घेऊन ये,
नाहीतर तुला पळवून नेऊन जीवे मारुन टाकेल,अशी धमकी दिली. हा प्रकार फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी सागर पवार याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-   Pune Crime News | Driver arrested for kidnapping 14-year-old boy and threatening to kill him

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime News | मुंबईतील आयआयटीमध्ये 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Amruta Khanvilkar | नवऱ्याबरोबर राहत नसलेल्या चर्चांवर अमृता खानविलकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाली….

 

Related Posts