IMPIMP

Pune Crime News | माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी, ३० लाखाच्या खंडणीची मागणी

by nagesh
Pune Crime News | Ex-Corporator Avinash Bagwe threatened to be shot dead, demand of Rs 30 lakh extortion

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे (Congress Former Corporator Avinash Bagwe) यांना पोलिटिकल करीअर बरबाद करुन गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Pune Police) अज्ञातावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार भवानी पेठेत मंगळवारी दुपारी ३ ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

 

याप्रकरणी अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८७/२३) दिली आहे. फिर्यादी अविनाश बागवे हे माजी मंत्री रमेश बागवे (Former Minister Ramesh Bagwe) यांचे पुत्र असून काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. ते मंगळवारी दुपारी घरी असताना त्यांना एकाने फोन करुन व मेसेज करुन गोळ्या घालून ठार माण्याची धमकी दिली. आम्ही सात जण आहोत. आमच्यातील दोघांना आत टाकले तरी इतर जण तुझ्या घरी व कार्यालयाबाहेर असतो, असा मेसेज पाठविला. तसेच निवडणुकीमध्ये उभे न राहण्याची तसेच राजकीय कारकिर्द नष्ट करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी (Extortion Case) मागितली. या प्रकारानंतर बागवे यांनी तातडीने गुन्हे शाखेशी संपर्क करुन माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक मानकर (Police Inspector Mankar) अधिक तपास करीत आहेत. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गेल्या आठवड्यात भाजपचे (BJP) सरचिटणीस गणेश बीडकर (Ganesh Bidkar) यांना फोन करुन
खंडणी (Ransom Case) मागण्याचा प्रकार समोर आला होता.
त्याअगोदर सायबर चोरट्यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Murlidhar Mohol)
यांचा मोबाईल हॅक करुन त्यांच्याच मित्राकडे ५ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यात दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

 

 

Web Title :- Pune Crime News | Ex-Corporator Avinash Bagwe threatened to be shot dead, demand of Rs 30 lakh extortion

 

हे देखील वाचा :

Mumbai Mantralaya News | पोलीस पत्नीचा आवाज सरकारपर्यंत पोहोचलाच नाही; मंत्रालयासमोर विषप्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

Pune Police Inspector Transfer | लष्कर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची बदली

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ स्वीकारणार काश्मीरमधील दहशतवादग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व; पुनीत बालन यांची घोषणा

 

Related Posts