IMPIMP

Pune Crime News | ‘हल्दीराम’ची फ्रँचाईजी देण्याच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक, खराडी परिसरातील प्रकार

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | हल्दीराम कंपनीची फ्रँचाईजी (Franchise of Haldiram Company) देण्याच्या आमिषाने एकाची पाच लाख 87 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार खराडी येथे 28 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान तक्रारदार यांच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.(Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मयंक अरविंद कुमारसिंग (वय-29 रा. झेन्सार टेक्नॉलॉजी जवळ, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9190389XXXXX या मोबाईल धारक, [email protected] ईमेल आयडी धारक व बँकेच्या खातेधारकावर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीशी फोनवरून तसेच ईमेल द्वारे संपर्क साधत त्यांना हल्दीराम
कंपनीची फ्रँचाईजी देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीनेही त्याच्यावर विश्वास ठेवला.
आरोपींनी वेगवेगळी कारणे देऊन फिर्यादी यांना 5 लाख 87 हजार 500 रुपये बँक खात्यात भरायला सांगितले.
मात्र पैसे देऊनही फ्रेंचाइजी तसेच दिलेले पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात
आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चंदननगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Sr. PI Rajendra Landge) करीत आहेत.

Related Posts