IMPIMP

Pune Crime News | मिलिटरी इंटेलिजन्सने दिलेल्या माहितीवरून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 2 लाखांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त, 4 जणांना अटक

by sachinsitapure
Pune Police Crime Branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मिलिटरी इंटेलिजन्सने दिलेल्या माहितीवरून पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Squad) एकने 2 लाख 14 हजार रुयये किंमतीचे मेफेड्रोन Mephedrone (एमडी – MD) जप्त केले आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून 3 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 31 ऑक्टोबर) रात्री साडे अकराच्या सुमारास शुक्रवार पेठेतील स्नेहदिप बंगल्यासमोरील सार्वजनिक रोडवर केली. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

रोनीत बिपून खाडे Ronit Bipoon Khade (वय-19 रा. सिंहगड रोड, हिंगणे, पुणे), चैतन्य शिवाजी सावले Chaitanya Shivaji shadows (वय-27 रा. कमलग्रीन लिप सोसायटी, किरकिटवाडी, पुणे), सार्थ विरेंद्र खरे Sarth Virendra Khare (वय-19 रा. आनंदनगर, सिंहगड रोड), विशाल कमलेश मेहता Vishal Kamlesh Mehta (वय-19 रा. सिंहगड रोड, पुणे) यांना अटक केली आहे. तर अनुष जोतिबा माने (रा. घोरपडी पेठ, पुणे) याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींवर खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) एन.डी.पी.एस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी व कर्मचारी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत
असताना शुक्रवार पेठेतील स्नेहदिप बंगल्यासमोरील सार्वजनिक रोडवर चार जण संशयित रित्या आढळून आले.
पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 2 लाख 14 हजार रुपये किंमतीचे
10 ग्रॅम 70 मिलीग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडर आढळून आली.

आरोपींकडे चौकशी केली असता विक्रीसाठी एमडी पावडर बाळगल्याचे सांगितले.
आरोपींनी हा अंमली पदार्थ अनुष माने याच्याकडून विक्री करीता आणल्याचे सांगितले.
चौघांकडून एमडी पावडर, चार मोबाईल असा एकूण 3 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts