IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – मांजरी मार्केट यार्डात चौघांनी व्यापार्‍याला लुटले

by nagesh
Pune Crime News | Hadapsar Police Station - Four men robbed a trader in Manjri market yard

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | खरेदी केलेला शेतमाल टेम्पोत भरला असता त्यातील कॅरेट जबरदस्तीने चोरुन नेणार्‍या गुंडांच्या टोळक्याला व्यापार्‍याने विरोध केला. तेव्हा त्याला धक्काबुक्की करुन त्याच्या खिशातील रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली.

 

याबाबत विजय नारायण घुले (वय ५३, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७३६/२३) दिली आहे. हा प्रकार मांजरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpan Bazar Samiti Manjari Budruk Market Pune) आण्णासाहेब मगर उपबाजार (Annasaheb Magar Bazar Manjari) आवारात सोमवारी दुपारी १ वाजता घडला. (Pune Crime News)

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी येथील उपबाजारात भरत मकासरे या व्यापार्‍याने शेतकर्‍यांकडून शेतमाल खरेदी केला होता.
तो शेतमाल ते टेम्पोमध्ये भरुन घेत होते. त्यावेळी चौघे जण तेथे आले. टेम्पोत भरलेल्या शेतमालाचे कॅरेट ते जबरदस्तीने घेऊन जाऊ लागले.
हे पाहून मकासरे यांनी त्यांना विरोध केला. तेव्हा त्यांना धक्काबुक्की करुन चौघा गुंडांनी त्यांच्या खिशाातील १२०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन
ते पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Hadapsar Police Station – Four men robbed a trader in Manjri market yard

 

हे देखील वाचा

Swati Sharad Mohol | छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वारद फाऊंडेशनच्या स्वाती शरद मोहोळ यांच्याकडून महिलांसाठी शौर्यपीठ धर्मपीठ तुळापूर सहलीचे आयोजन

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीला पुण्यातून पहिला धक्का, शरद पवारांचा खास शिलेदार भाजपात जाणार

Pune Pimpri Chinchwad Police News | ‘फ्री पास’बाबत खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या गंभीर
आरोपानंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून संबंधितावर कडक कारवाई

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – मुलीच्या वडिलांनी धमकीला घाबरुन केली आत्महत्या

Related Posts