IMPIMP

Pune Crime News | ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणे पडले महागात, वानवडी येथील ज्येष्ठ नागरिकाची 40 लाखांची फसवणूक

by sachinsitapure
Trading Investment Fraud

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक (Trading Investment) करण्यास सांगत एका ज्येष्ठ नागरिकाची 40 लाखांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत वानवडी येथील जगताप चौकातील एम जे के अॅकेडमी (MJK Academy Wanavadi) येथे घडला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत जोन पॉलराज व्हिन्सेट Joan Paulraj Vincent (वय-51 रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रवि नरोत्तम ओझा Ravi Narottam Ojha (रा. प्रितम सोसायटी, यश लॉन्स समोर, बिबवेवाडी) याच्यावर आयपीसी 406, 420 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना त्याच्या एम जे के अॅकेडमी
येथील ट्रेडिंगमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यास सांगितले. पैसे गुंतवल्यास आठवड्याला 5 लाख रुपये देण्याचे आमिष
आरोपीने दाखवले. फिर्यादी यांनी आरोपी रवि ओझा याच्यावर विश्वास ठेवून सेवानिवृत्तीनंतर मिळालेली 43 लाख 50 हजार रुपयांची रक्कम ट्रेडिंग अकाउंटमध्ये (Trading Account) गुंतवली. आरोपीने फिर्यादी यांच्या ट्रेडिंग अकाउंचा युजर नेम व पासवर्ड घेऊन कोणताही परतावा दिला नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात आरोपी रवि ओझा विरोधात तक्रार अर्ज केला.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना 3 लाख 50 हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित 40 लाख रुपये परत न करता फिर्यादी
यांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली. आरोपीने फिर्यादी यांच्यासह इतर अनेक लोकांची फसवणूक केली आहे.
पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Related Posts