IMPIMP

Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यातील बँकेसह वित्तीय संस्थेची कोट्यवधीची फसवणूक, तीन जणांवर FIR

by sachinsitapure
Financial Fraud

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | बनावट कागदपत्रे (Forged Documents) तयार करुन ती बँकेत आणि इतर वित्तीय संस्थेकडे देऊन कर्ज मंजुर (Loan Approval) करुन घेत आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला असून हा प्रकार (Pune Crime News) नोव्हेंबर 2014 ते डिसेंबर 2020 या कालावधीत वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथे घडला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत घोरपडी येथील 29 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी इरफान अमीरहमजा मुल्ला (वय-55), अमीरहमजा आदम मुल्ला (वय-65), यासमीन इरफान मुल्ला (वय-50 रा. गणेशनगर, वडगाव शेरी) यांच्यावर आयपीसी 420, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या व्यवसायाकरीता कोटक महिंद्रा बँकेत (Kotak Mahindra Bank)
फिर्यादी यांचे वडगाव शेरी येथील मिळकत क्रमांक 1 व 2 तारण ठेवून 1 कोटी 20 लाख 3 हजार 386 रुपयांचे कर्ज मंजुर
करुन घेतले. आरोपींनी या कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक केली.
तसेच या मिळकीचे मुळ कागदपत्रे फिर्यादी यांच्याकडे असताना मिळकतीचे बनावट दस्तऐवज तयार केले.
हे दस्तऐवज वेगवेगळ्या वित्तीय संस्थेत दाखल करुन ते खरे असल्याचे भासवून त्यावर कर्ज मंजूर करुन घेतले.
आरोपींनी कोटक महिंद्रा बँकेची तसेच इतर बँकांचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.

 

Related Posts