IMPIMP

Pune Crime News | पेरणे फाटा येथील बसस्थानकावर पाच जणांचे ११ तोळ्यांचे दागिने लंपास

by nagesh
Pune Crime News | Jewelery worth 11 tolas of five people looted at the bus stand in Perne Phata

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा चोरट्याने
घेतला असून बसमध्ये चढताना नागरिकांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याच्या ५ घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये ३ लाख रुपयांचे ११ तोळे
दागिने चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत मंगळवार पेठेतील महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या पतीसह १ जानेवारी रोजी पेरणे फाटा येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेल्या होत्या.
अभिवादन सोहळा झाल्यानंतर ते पेरणे टोलनाका येथील बस स्टॅडवर आले. बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरले. बसमध्ये बसल्यावर त्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी बसमधील लोकांकडे विचारपूस करत असताना बसथांब्याचे शेजारी थांबलेल्या लोकांचा गोंधळ सुरु होता. त्यांच्याकडे चौकशी केली असता तेथील आणखी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण गर्दीत कोणीतरी काढून घेतल्याचे आढळून आले. त्याशिवाय शाहुवाडी, हडपसर, काळेपडळ येथील दोघा तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याचे आढळून आले. चोरट्यांनी दोन गंठण व तीन सोनसाखळ्या असा ३ लाख २ हजार रुपयांचे ११ तोळे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याचे आढळून आले. लोणीकंद पोलीस तपास करीत आहेत. (Pune Crime News)

 

 

Web Title :- Pune Crime News | Jewelery worth 11 tolas of five people looted at the bus stand in Perne Phata

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | खिशात पैसे न मिळाल्याने तरुणाच्या पोटात चाकू खुपसुन केले जखमी; येरवड्यातील गुंजन चौकातील घटना

Mahavitaran Strike | पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणची बत्ती गुल; अनेक ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा खंडीत

Chitra Wagh | औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्यावरून चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वक्तव्याने पुन्हा एकदा नामांतरणाचा वाद पेटण्याची चिन्हे

 

 

Related Posts