IMPIMP

Pune Crime News | हत्याराचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील रोकड लुटली, लोहगाव-वाघोली रोडवरील घटना

by sachinsitapure
Viman Nagar Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | लोखंडी हत्याराचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडून 28 हजार 870 रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. ही घटना शनिवारी (दि.11) रात्री सव्वा अकराच्या सुमारास लोहगाव-वाघोली रोडवरील एच.पी. पेट्रोल पंप (HP Petrol Pump Lohgaon-Wagholi Road) येथे घडली आहे. याप्रकरणी चार अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत राहुल भिमराव पिंगळे (वय- 24 रा. दादाची वस्ती, लोहगाव-वाघोली रोड, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांविरुद्ध आयपीसी 392, 427, 452, 34 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लोहगाव-वाघोली रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपावर कामाला आहेत. शनिवारी रात्री फिर्यादी व त्यांचे सहकारी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये बसले होते. रात्री सव्वा अकराच्या सुमारास चार अनोळखी चोरटे तोंडाला कपडा बांधून जबरदस्तीने ऑफिसमध्ये घुसले.
त्यांनी फिर्यादी यांना लोखंडी हत्याराचा धाक दाखवून जबरदस्तीने 28 हजार 870 रुपयांची रोकड घेतली.
तसेच फिर्यादी यांच्या सहकाऱ्याचा मोबाईलचे नुकसान करुन रोकड चोरून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पोटे (API Pote) करीत आहेत.

Related Posts