IMPIMP

Low Blood Pressure | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

by sachinsitapure
Low Blood Pressure

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम – आजच्या काळात कमी रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे (Low Blood Pressure). काही लोक या समस्येकडे दुर्लक्ष देखील करतात. मात्र दुर्लक्ष करणं आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तुम्हालाही लो बीपीचा त्रास असेल, तर तुम्हाला त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. कमी रक्तदाबाची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत (Low Blood Pressure). परंतु तरीही त्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. लो बीपीची लक्षणे काय आहेत ? आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवता येईल? जाणून घेऊयात.

कमी रक्तदाबाची लक्षण खालीलप्रमाणे (Low BP Symstoms) –
1) शरीरात पाण्याची कमतरता

2) सतत अधिक चिंतेत राहणे

3) जास्त वेळ उपाशी राहणे

कमी रक्तदाबाचे संकेत –
चक्कर येणे (Dizziness), अंधुक दिसणे (Blurred Vision), मूर्च्छा येणे (Fainting), हात पाय थंड होणे (Cold Hand And Feet), थकवा जाणवणे (Weakness) .

तुमचा रक्तदाब कमी झाल्यास हे उपाय करा (Low Blood Pressure) –

1- तुमचे बीपी नेहमीच कमी असेल, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुम्ही तुमचे शरीर सतत हायड्रेटेड ठेवावे.
यासाठी तुम्ही रोज 8 ग्लास पाणी पिऊ शकता.

2- बीपी कमी असल्यास मीठाचे जास्त सेवन करावे. बीपी नॉर्मल करण्यासाठी तुम्ही तुमच्या जेवणात मीठाचे प्रमाण वाढवावे.

3- बीपी सतत कमी असेल तर आहारात कॅफिन असलेल्या गोष्टींचा समावेश करा, असं केल्याने बीपी नियंत्रणात राहतो.

4- हंगामी फळे खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो. त्यामुळे तुम्हाला बीपी नियंत्रणात ठेवायचा असेल तर तुम्ही हंगामी फळांचे सेवन सुरू करावे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Related Posts