IMPIMP

Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

by sachinsitapure
Imbalance Mental Health

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – आपल्या शरीरासाठी मानसिक आरोग्य व्यवस्थित असणं खूप महत्वाचे आहे (Imbalance Mental Health). आपल्या मनात अत्यंत विचार चालू असेल, तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. तुम्हाला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या असतील, तर तुम्हाला त्याची लक्षणे शरीरात स्पष्टपणे दिसतात (Mental Health Affect To Physical Health). जाणून घेऊयात तुमची मेंटल हेल्थ खराब असेल, तर त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो. कारण मेंटल हेल्थकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते (Imbalance Mental Health).

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अनेकदा तुमच्या शारीरिक आरोग्यामध्ये समस्या आल्यावर तुमच्या मनावर परिणाम होतो. तसेच जेव्हा तुमचे मानसिक आरोग्य (Mental Health) बिघडते. तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होतो. एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य खराब असेल तर नैराश्याची लक्षणे दिसू लागतात (Depressive Disorder). नैराश्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होतो (Imbalance Mental Health).

मानसिक आजाराचे हे परिणाम शरीरावर दिसून येतात –

1) जर कोणी डिप्रेशनमध्ये असेल (Depression), तर त्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. बरेच लोक पोटदुखीला हलक्यात घेतात (Abdominal Pain). अशा परिस्थितीत तुम्ही त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

2) तुम्हाला कोणत्याही प्रकारची मानसिक आरोग्याबद्दल समस्या असल्यास, तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो
(Headache). जर तुम्हाला सतत डोकेदुखीची त्रास होत असेल, तर समजून घ्या की तुम्ही मानसिक आरोग्या
संबंधित समस्यांशी लढत आहात.

3) छातीत जळजळ (Heartburn) किंवा ऍसिडिटी (Acidity) हे देखील डिप्रेशनचे लक्षण आहे. तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल,
तर वेळीच सावध व्हा. कारण छातीत जळजळ हे देखील मानसिक आजाराचे लक्षण आहे.

Related Posts