IMPIMP

Pune Crime News | मिलिटरीमध्ये असल्याचे भासवून नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक, पुण्यातील प्रकार

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मिलिटरीमध्ये सिव्हिलीयन म्हणून काम करत असल्याचे सांगून मुलांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेकांची 13 लाखांची फसवणूक केली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते जुलै 2023 या कालावधीत कोंढवा परिसरात घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत रामदास माणिकराव देवर्षे (वय-52 रा. शंकर रुक्मीणी अपार्टमेंट, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश बाबुलाल परदेशी Ganesh Babulal Pardeshi (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द) याच्यावर आयपीसी 406, 420, 464अ, 465, 468 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी शनिवारी (दि.25) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश परदेशी याने फिर्यादी यांना मिलिटरी मध्ये सिव्हिलियन म्हणून नोकरी करत असल्याचे सांगितले. तसेच विधान भवन कौन्सिल हॉल पुणे येथे कायमस्वरुपी नोकरी करत असल्याचे सांगून त्याठिकाणी शिक्षण झालेल्या मुलांना साहेबांच्या मध्यस्थीने नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. परदेशी याने फिर्यादी यांच्या दोन मुलींना नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये खर्च असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी मुलींना नोकरी लावण्यासाठी आरोपीला वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरुपात पाच लाख रुपये दिले. (Pune Crime News)

यानंतर गणेश परदेशी याने गॅरिसन इंजिनिअर जी.ई.(एन) पुणे या नावाने बनावट शिक्के तयार केले.
त्यावर एस ओ.2 डायरेक्टर बोर्डाचे ऑफिसर एस.के. जैन यांची बनावट सही करुन जॉईनिंग लेटर दिले.
आरोपीने फिर्यादी यांच्या मुलींना नोकरी न लावता फसवणूक केली. तसेच इतरांकडून 8 लाख 32 हजार रुपये घेऊन
त्यांची देखील आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

  1. पुणे : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत तरुणीची 10 लाखांची फसवणूक
  2. जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक, सिंहगड रोड परिसरातील घटना

Related Posts