IMPIMP

Pune Crime News | कात्रज परिसरात दहशत निर्माण करणार्‍या गुंडांच्या टोळीवर ‘मोक्का’

by nagesh
Pune Crime News | MCOCA Mokka Action on a gang of gangsters creating terror in Katraj area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कात्रज (Katraj) आणि परिसरात दहशत निर्माण करणार्‍या गुंडांच्या टोळीविरूध्द पोलिस
आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) MCOCA (Mokka Action) कारवाई
केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यामध्ये टोळीचा म्होरक्या साकिब मेहबूब चौधरी उर्फ लतिफ बागवान (वय २३), रेहान सीमा शेख उर्फ रेहान दिनेश शेख (वय १९), अब्दुलअली जमालउद्दीन सैय्यद (वय १९), संकेत किशोर चव्हाण (वय १८), ऋतिक चंद्रकांत काची (वय २१, सर्व रा. कात्रज), एक अल्पवयीन मुलासह एका अल्पवयीन मुलीासह 11 जणांचा समावेश आहे. आरोपी रेहान शेख, अब्दुलअली सय्यद, संकेत चव्हाण, ऋतिक काची यांना अटक करण्यात आली आहे. टोळी प्रमुख लतिफ बागवान याच्यासह सहा जणांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहेत. (Pune Crime News)

 

बागवान आणि साथीदारांच्या विरुद्ध खंडणी, जबरी चोरी, दुखापत, दहशत माजविणे असे गंभीर
गुन्हे दाखल झाले होते. टोळीच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ
पोलीस ठाण्याचे व. पो. निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar), पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik), उपनिरीक्षक वैभव गायकवाड (PSI Vaibhav Gaikwad) यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil) यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला हाेता. या प्रस्तावास पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मंजुरी दिली.

 

 

Web Title : Pune Crime News | MCOCA Mokka Action on a gang of gangsters creating terror in Katraj area

 

हे देखील वाचा :

Baramati NCP MP Supriya Sule | वारजे येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण; बारामती मतदार संघातील गॅस पाईपलाईन, सीएनजी आणि स्वछतेबाबतही सविस्तर चर्चा

Baramati NCP MP Supriya Sule | दौंड तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योगांना भेट देण्यासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण

Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar | पीक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही फळपीक विम्याचा लाभ देण्याबाबत विचार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

Bhaskar Jadhav | आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन भास्कर जाधव परतले; नेमकं काय घडलं?

 

Related Posts