IMPIMP

Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन पत्नीचा खून, नराधम बापाला लोणीकंद पोलिसांकडून अटक

by sachinsitapure
Lonikand Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) विनयभंग (Molestation Case) करणाऱ्या पतीला विरोध केल्याच्या कारणावरुन पत्नीला बेदम मारहाण करुन खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना (Pune Crime News) लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतील माळवाडी येथील माहेर संस्थेजवळ गुरुवारी (दि. 31 ऑगस्ट) रोजी घडली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी मयत महिलेच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नाराधम बापाला अटक (Arrest) केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी दारु पिऊन तिचा विनयभंग केला. यावरुन आरोपी आणि पत्नी यांच्यात वाद झाला होता. यानंतर 31 ऑगस्ट रोजी पहाटे आरोपीने मुलगी झोपली असताना पुन्हा तिचा विनयभंग केला. (Pune Crime News)

पीडित मुलीने आरडा ओरडा केल्याने तिच्या आईने येऊन पतीला विरोध केला. आरोपीने पत्नीला लाकडी बांबुने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भिंतीवर डोके आपटून खाली पाडून तिच्या गळ्यावर पाय देऊन तिचा गळा जोरात दाबला. त्यावेळी आईला सोडवण्यासाठी फिर्य़ादी आणि तिचा भाऊ आले असता आरोपीने त्यांना देखील बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपीने दुचाकीमधील पेट्रोल आणून फिर्यादी यांच्या आईच्या अंगावर आणि गुप्तांगावर टाकून जाळून मारण्याची धमकी दिली.

मुलीने हा सर्व प्रकार तिच्या मामाला सांगितला.
मामाने लगेच या घटनेची माहिती पोलिसांना देऊन जखमी झालेल्या फिर्य़ादी यांच्या आईला दवाखान्यात
उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे (Sr PI Vishvajeet Kaingade) यांच्या मार्गदर्शनाखाली
लोणीकंद पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Related Posts