IMPIMP

pune Crime News | रुपाली चाकणकरांच्या फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट, 7 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime News | Offensive comments on Rupali Chakankar’s Facebook, FIR against 7 people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | महिला आयोगाच्या अध्यक्षा (Women’s Commission Chairperson) रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या बाबत फेसबुक-यूट्यूबवर अश्लील कमेंट (Obscene Comments) करणं सात जणांना भोवलं आहे. अश्लील कमेंट करणाऱ्या 7 जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नाशिकच्या सभेवेळी सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) बोलत असताना 5 जणांकडून रुपाली चाकणकर यांच्याबाबत यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर करत कमेंट केल्या होत्या. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी 354 ए, 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केल आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत युवराज विलास चव्हाण Yuvraj Vilas Chavan (वय-31 रा. धायरी) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रुपाली चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात काम करतात. तसेच ते सोशल मीडियाचे कामकाज पाहतात. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 6 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत रुपाली चाकणकर या फेसबुकवर लाईव्ह करत असताना दोघांनी अक्षेपार्ह कमेंट केल्या. (Pune Crime News)

तसेच 8 जुलै रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यंची नाशिक येथे सभा होती.
त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे ह्या बोलत असताना त्याचे लाईव्ह प्रक्षेपण एका
टिव्ही चॅनलच्या युट्युबवर सुरु होते. त्यावेळी काही जणांनी अश्लील शब्दात कमेंट केल्या.
युवराज चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Offensive comments on Rupali Chakankar’s Facebook, FIR against 7 people

Related Posts