IMPIMP

Pune Crime News | पर्वती पोलिस स्टेशन : तरुणीची छेड काढल्यावरुन जनता वसाहतीत दोन गटात ‘राडा’; जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | parvati police station quarrel in two groups in janata vasahat after teasing a young woman attempt to kill

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | एकाच्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरुन जनता वसाहतीत (Janta Vasahat Pune) दोन गटाने राडा घातल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोन्ही गटांवर जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी एका १६ वर्षाच्या मुलाने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिजित पाटील, संकेत लोंढे (रा. जनता वसाहत), प्रमोद कळंबे (रा. पर्वती दर्शन), बिट्टया कांबळे, अनंता खोले ऊर्फ भुलाप्पा, आज्ज्या उर्फ अजित (रा. जनता वसाहत), शुभम गजधने व अब्दुल अशा ८ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दांडेकर पुलावरील (Dandekar Bridge) रामकृष्ण मठाचे गेटशेजारी शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे मित्र सुभाष चलवादी, सुहास शेरखाने, केतन गायकवाड यांच्यासह शतपावली करत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी या मुलाला तू व आदित्य यांनी माझ्या बहिणीला का छेडले, असे म्हणून फिर्यादीच्या शर्टची कॉलर पकडून कानाखाली मारली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुला संपवून टाकतो, असे बोलून शर्टच्या आत लपवून ठेवलेला कोयता काढून भाई लोकांना शिवी देतो का तुला खल्लास करतो असे म्हणून फिर्यादीच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वसाहतीमध्ये येऊन फिर्यादीचा मित्र वैभव मोरे याच्या घरी घुसून त्याच्या आईस शिवीगाळ केली. वसाहतीमध्ये कोयता हवेत फिरवून पोलिसात तक्रार दिली तर एक एकाचा मर्डर करुन टाकेन, अशी धमकी दिली. (Pune Crime News)

याविरोधात जनता वसाहतीतील एका ३५ वर्षाच्या तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. २१८/२३) दिली आहे.
त्यानुसार, नव्या वाडकर, वैभव मोरे, यश वाघमारे, सम्या कारंडे (सर्व रा. जनता वसाहत) तसेच एका अल्पवयीन
मुलासह त्यांच्या दोन साथीदारांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांची बहिण टिव्हीचा रिचार्ज संपलयाने रिचार्ज करण्यासाठी १९ जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारात दुकानात गेली होती.
त्यावेळी नव्या वाडकर याने तिच्या डोक्यात कोयता मारला असता तिने तो हुकविला.
वैभव मोरे यानेही त्याच्याकडील कोयता फेकून मारला, तोही तिने चुकविला.
त्यांच्याबरोबरच्या मुलांनी कुत्र्याची बहिण आली, असे म्हणत अश्लिल शिवीगाळ करुन बहिणीचा विनयभंग
(Molestation Case) केला होता. यावरुन शनिवारी रात्री तिच्या भावाने मित्राच्या मदतीने दुसर्‍या गटावर हल्ला केला.
पोलीस उपनिरीक्षक जगदाळे (PSI Jagdale) तपास करीत आहेत

 

Web Title : Pune Crime News | parvati police station quarrel in two groups in janata vasahat after teasing a young woman attempt to kill

हे देखील वाचा

Related Posts