IMPIMP

Nana Patole | सत्तेसाठी काही पण करण्याची सत्तापिपासू व्यवस्था भाजपने निर्माण केली, नाना पटोलेंचे टीकास्त्र

by nagesh
Nana Patole | bjp is a party against the democratic system criticism of nana patole

अकोला : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजप (BJP) लोकशाही व्यवस्थेच्या विरोधातील पक्ष आहे. त्यांचे खाण्याचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे
दात वेगळे आहेत. दुसऱ्याचे घर फोडून स्वत:चे घर सजवता येत नाही, अशी टीका काँग्रेस (Cognress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी
भाजपवर केली आहे. अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना नाना पटोले (Nana Patole) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, 2017 मध्ये भाजपची खासदारकी (MP) सोडून आलो आहे. त्यामुळे भाजप कसा पक्ष आहे याची पूर्ण जाणीव
आहे. भाजपबद्दल नागरिकांमध्ये पहिल्यासारखी सहानुभूती राहिलेली नाही. भाजपबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. त्याचा प्रत्यय पदवीधर
मतदारसंघाच्या निवडणुकीत (Graduate Constituency Elections) दिसून आल्याचे पटोलेंनी सांगितले.

 

अजित पवार पक्ष सोडणार नाहीत
काँग्रेसला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) काय चालले याची मला कल्पना नाही. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत नागपूरच्या सभेत एकत्र होतो. त्यांचा स्वतंत्र पक्ष असून ते पक्षाला सोडून जाणार नसल्याचे पटोले यांनी सांगितले.

 

 

सत्तापिपासू व्यवस्था भाजपने निर्माण केली
राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेरोजगारीमुळे तरुण त्रस्त आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना या गंभीर प्रश्नाशी काहीही देणेघेणे नाही. सत्तेसाठी काही पण करण्याची सत्तापिपासू व्यवस्था भाजपने निर्माण केली आहे. या विरोधात काँग्रेसने लढा उभारला आहे.

 

 

घर फोडणे भाजपचे काम
एकमेकांची घर फोडण्याचे काम भाजपने सुरु केले आहे. ‘लोटस’ हा प्रेमाचा शब्द आहे. दुसऱ्याची घरे तोडणारा नाही. केंद्र सरकारने (Central Government) ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) माध्यमातून विरोधकांना दाबण्याचे काम केले आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nana Patole | bjp is a party against the democratic system criticism of nana patole

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘अजित पवारांचं वक्तव्य हे फूलस्टॉप नसून कॉमा, अजूनही काहीही होऊ शकतं’

MahaDBT | ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

Maharashtra Political News | अजित पवारांनी संजय राऊतांना का सुनावलं?, संजय शिरसाटांनी सांगितले कारण, म्हणाले…

Ajit Pawar | ‘तर अजित पवारांनी आधीच खंडन केलं असतं, पण…’ अजित पवारांच्या भूमिकेवर शिंदे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया

 

Related Posts