IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – मुलीच्या वडिलांनी धमकीला घाबरुन केली आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News: Hadapsar Police Station - Girl's father commits suicide due to fear of threatPune Crime News | Pune Crime News: Hadapsar Police Station - Girl's father commits suicide due to fear of threat

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून दिले नाही तर दुसरीकडे कोठे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याने एका मुलीच्या वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

परमेश्वर रमेश पात्रे Parameshwara Ramesh Patre (वय ४०, रा. गोंधळेनगर, हडपसर – Hadapsar News) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत हडपसर पोलिसांनी मुकेश गोपाळ देढे Mukesh Gopal Dedhe (वय २१, रा. चंदननगर चौकीसमोर, खराडी – Kharadi) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२२ ते ७ मे २०२३ दरम्यान घडला. याबाबत जया पात्रे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७३०/२३) दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश देढे हा फिर्यादी यांच्या मुलीबरोबर लग्न करणार असल्याचे
सांगत होता. तुम्हाला काय करायचे ते करा, जर तुम्ही मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दिले नाही तर तिचे
दुसरीकडे कोठेही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी तो वारंवार देत होता.
त्याच्या सततच्या धमक्यांमुळे ७ मे रोजी परमेश्वर पात्रे यांनी घरासमोरील बाथरुममध्ये जाऊन गळफास
घेऊन आत्महत्या केली. धार्मिक कार्य पूर्ण केल्यानंतर आता फिर्याद देण्यात आली असून
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News: Hadapsar Police Station – Girl’s father commits suicide due to fear of threat

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरलेल्या 9 पैकी 2 मुलींचा बुडून मृत्यु; बुलढाणा जिल्ह्यातील मुली

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता! सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

ACB Demand Case | अ‍ॅन्टी करप्शन न्यूज : 25 हजाराच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार विरूध्द एसीबीकडून गुन्हा

 

Related Posts