IMPIMP

Pune Crime News | पुण्यात कोयत्याची दहशत कायम! कॉलेजच्या बॅगमध्ये आणला कोयता, पोलिसांनी घडवली अशी अद्दल

by nagesh
Pune Crime News | terror of koyta was brought in the college bag instead of a book

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | काही दिवसांपूर्वी सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने हल्ला (Assault On Girl In Sadashiv Peth Pune) केल्याची घटना घडली होती. पुण्यातील सदाशिव पेठेत घडलेली घटना ताजी असताना आता एका तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता आणल्याचा प्रकार समोर आला आहे. याची माहिती (Pune Crime News) मिळताच पोलिसांनी (Pune Police) तात्काळ दखल घेत तरुणाला अटक (Arrest) केली. तसेच अशा घटनांना चाप बसावा यासाठी तरुणाला चांगीलीच अद्दल पोलिसांनी घडवली. पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाची चक्क कॉलेजमध्ये धिंड काढली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

कुणाल कानगुडे Kunal Kangude (वय-19) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कुणालचे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात (Abasaheb Garware College) डॅनी या तरुणासोबत वाद झाले होते. त्यानंतर कॉलेजमध्ये दहशत राहावी तसेच काही भांडणाच्या कारणामुळे त्याने कॉलेजच्या बॅगमधून कोयता आणला. त्याने कोयता काढून कॉलेजमध्ये दहशत माजवली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कॉलेजमधील सीसीटीव्ही तपासून कुणाल कानगुडेला बेड्या ठोकल्या. तसेच डेक्कन परिसरातून त्याची धिंड काढली. (Pune Crime News)

कोयत्यावरुन पती-पत्नीत वाद

घरातील कोयता शेजाऱ्याला देण्याच्या वादातून दाम्पत्याने परस्परांना मारहाण केल्याची घटना मार्केटयार्ड (Market Yard) परिसरात घडली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सोसायटीत राहणाऱ्या एकाने झाड कापण्यासाठी कोयता किंवा कात्री आहे का? अशी विचारणा केली. कोयता देण्यावरुन दोघांमध्ये वाद झाले. या वादातून दोघांनी एकमेकांना मारहाण केली.
तसेच कोयत्याने हल्ला केला, असे दोघांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title : Pune Crime News | terror of koyta was brought in the college bag instead of a book

Related Posts