IMPIMP

Pune Crime News | उत्तमनगर परिसरातील बिल्डरच्या घरी चोरी ! 29 लाखांचा ऐवज लंपास

by nagesh
Pune Crime News | Theft at the builder’s house in Uttamnagar area! 29 lakhs looted

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | बांधकाम व्यावसायिक (Construction Professional) असलेला तरुण मध्यरात्री मित्राला भेटण्यासाठी गेला. अवघ्या दोन तासाच्या काळात चोरट्यांनी घर साफ करताना 12 लाख रुपयांच्या रोकड सह 29 लाखांचा ऐवज चोरुन नेला. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत अक्षय सुरेश नाणेकर Akshay Suresh Nanekar (वय 30, रा. जयश्री निवास, न्यू कोपरे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 76/2023) दिली आहे. हा प्रकार रविवारी मध्यरात्री बारा ते पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय नाणेकर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या पत्नीच्या बहिणीचे लग्न असल्याने त्या पाषाणला माहेरी गेल्या होत्या. नाणेकर हे रविवारी रात्री 12 वाजता घराला कुलूप लावून मित्राला भेटण्यासाठी डोणजे येथे गेले होते. तेथून ते पहाटे सव्वा दोन वाजता घरी परत आले. तेवढ्या वेळात चोरट्यांनी डाव साधला. घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉकर तोडले. त्यातील 31 तोळे सोन्याचे दागिने, 12 लाख रुपयांची रोकड, मोबाईल, लॅपटॉप असा 29 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस निरीक्षक शेख (PI Shaikh) अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Theft at the builder’s house in Uttamnagar area! 29 lakhs looted

Related Posts