IMPIMP

Pune Crime News | विद्या सहकारी बँकेच्या एटीएममधून चोरट्यांनी घातला ५८ लाखांना गंडा; ६२६ व्यवहाराद्वारे केली फसवणूक

by sachinsitapure
Vidya Sahakari Bank

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | भारती सहकारी बँकेला (Bharti Cooperative Bank) सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) गंडा घालण्याचा प्रकार नुकताच समोर आला असताना विद्या सहकारी बँकेच्या (Vidya Sahakari Bank) एकाच एटीएममधून चोरट्यांनी ६२६ ट्रान्झॅक्शन्सद्वारे मशीनमधून पैसे काढून तब्बल ५७ लाख ९५ हजार ९०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत विद्या सहकारी बँकेचे अधिकारी स्वप्निल भिमराज पवार (वय ३६) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८६/२३) दिली आहे. हा प्रकार विद्या सहकारी बँकेच्या नवी पेठ येथील शाखेच्या एटीएममध्ये ८ जानेवारी २०२३ ते १५ जून २०२३ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने वेगवेगळ्या बँकांचे कार्ड वापरुन नवी पेठ शाखेतील एटीएममध्ये ६२६ व्यवहार केले. एटीएम मशीनमध्ये या कार्डचा वापर करुन पैसे बाहेर पडत असताना मशीनच्या स्लॉटमध्ये हाताचे बोट घालून त्यातील फ्लॅप धरुन ठेवला. त्यावेळी पैसे देखील काढून घेतले. अशा प्रकारे ५७ लाख ९५ हजार ९०० रुपये काढले. या मध्ये व्यवहार पूर्ण न झाल्याची नोंद होते. प्रत्यक्षात मशीनमधून पैसे काढले जातात. (Pune Crime News)

हा प्रकार लक्षात आल्यावर विद्या सहकारी बँकेने ज्या बँकेच्या कार्डचा वापर करुन ही फसवणूक केली.
त्या बँकांना त्याची माहिती दिली. या ६२६ व्यवहारापैकी ३१६ व्यवहारात काढण्यात आलेली २९ लाख ५ हजार १०० रुपये
संबंधित बँकांकडून परत मिळालेली आहे. ३१० व्यवहाराचे २८ लाख ९० हजार ८०० रुपये फसवणूकीची रक्कम परत येणे
बाकी आहे. संबंधित बँकेकडून पैसे मिळविण्यासाठी अखेर बँकेचे पोलिसांकडे फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा
दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नानेकर (Assistant Police Inspector Nanekar) तपास करीत आहेत.

Related Posts