IMPIMP

Pune Crime News | टिळक चौक : काळ्या काचांमुळे तोतया पोलिस जाळ्यात, सातारा जिल्हयातील ओमकार धर्माधिकारीला अटक

by nagesh
 Pune Crime News | Tilak Chowk: Omkar Dharmadhikari arrested in Satara district in police net due to black glasses

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | गाडीला काळ्या काचा लावून बिनधास्त फिरणारा व चौकशी करणाऱ्या पोलिसांवर रुबाब
करणार्‍याचा पेहराव, वाढलेले केस, दाढी पाहून त्याची तोतयागिरी उघड झाली. विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) त्याला अटक केली आहे. (Pune
Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ओमकार विलास धर्माधिकारी Omkar Vilas Dharmadhikari (वय ३२, रा. मु़ पो. अनपटवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा – Satara Crime News) असे या तोतयाचे नाव आहे.

 

याबाबत पोलीस शिपाई सागर बाजीराव पाडळे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६८/२३)दिली आहे. ही घटना अलका टॉकिजजवळील टिळक चौकात मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली. (Pune Crime News)

 

पोलीस शिपाई सागर पाडळे व त्यांचे सहकारी टिळक चौकात वाहतूक नियमन करत होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक कार टिळक चौकातून केळकर रोडला जात होती. या गाडीला काळ्या काचा लावल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपण पोलीस असल्याचे सांगितले. वर ‘‘माझ्यावर कारवाई करु नका, नाही तर तुम्हाला महाग जाईल,’’ अशी धमकी दिली.  त्याच्या बोलण्या -वागण्यावरुन व त्याचा पेहराव तसेच त्याचे वाढलेले केस व दाढी यामुळे पोलिसांना तो पोलीस नसल्याचा संशय आला. त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यावर त्याने सातारा पोलिसाचे (Satara Police) ओळखपत्र दाखविले. त्याच्याकडे पदाबाबत तसेच त्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांबाबत चौकशी केल्यावर तो गोंधळला. अधिक चौकशी केल्यावर त्याने मित्राचे पोलिस ओळखपत्र बघुन त्याप्रकारचे डुप्लीकेट ओळखपत्र बनविल्याचे सांगितले. वाहतूक पोलिसांनी त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Tilak Chowk: Omkar Dharmadhikari arrested in Satara district in police net due to black glasses

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | मार्केटयार्ड : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासकाविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण, अखेर मुंडे बहिण भावाच्या संघर्षाला पूर्णविराम!

Maharashtra Politics News | बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, शिवसेनेच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

 

Related Posts