IMPIMP

Maharashtra Politics News | बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, शिवसेनेच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

by nagesh
Maharashtra Politics News | babri masjid was demolished by shiv sainiks said shinde faction leader sanjay shirsat

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Maharashtra Politics News | बाबरी मशीदीवरुन (Babri Masjid) भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील
(Chandrakant Patil) यांनी बाळासाहेबांबाबत (Balasaheb Thackeray) केलेल्या वक्तव्यावरुन ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांकडून
टीका होत आहे. त्यातच आता शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे नेते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय
शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया (Maharashtra Politics News) देताना चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. बाबरी पाडताना
तिथे शेकडो शिवसैनिक होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य करायला नको पाहिजे असे शिरसाट म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राम जन्मभूमीचं जे आंदोलन (Ayodhya Ram Janmabhoomi) होते, ते कोणत्याही एका पक्षाचे नव्हते. देशभरातील प्रत्येक हिंदू आणि रामभक्त या आंदोलनाच्या बाजूने होता. त्यामुळे त्याला पक्षाच्या चौकटीत आणू नका. अनेकजण गेले होते. अनेकांचे जीव गेले. त्यामुळे या पक्षाचे होते, त्या पक्षाचे होते असे कधीही ग्राह्य धरु नका. तसेच त्यावेळी जे आंदोलन झाले, त्यामुळेच आज राम मंदिर उभारलं जात असल्याचे शिरसाट म्हणाले. (Maharashtra Politics News)

 

आम्ही सहमत नाही – उदय सामंत

बाबरी मशिदीचा ढांचा पाडण्यात आला, तेव्हा शिवसैनिक तिथे होते. त्यावेळी बाळासाहेब, आडवाणीजी (LK Advani) यांच्यावर गुन्हे दाखल झाले. सर्वात आधी समर्थन करणारे बाळासाहेब ठाकरे हेच होते. चंद्रकांत दादा यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. 1993 ची दंगल झाली ती बाळासाहेब यांच्यामुळे आटोक्यात आली. बाळासाहेब म्हणाले होते की, माझ्या शिवसैनिक यांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे. असं म्हणत उदय सामंत (Uday Samant) यांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) अनेकवेळा बाळासाहेबांचा उल्लेख खूप आदराने केला आहे. त्यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त करतात. त्यामुळे दादांचे वक्तव्य म्हणजे भाजपचे नाही. मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील. भाजप म्हणून दादा हे बोलले नाहीत. आम्हाला बदनाम करणे हा त्यांचा उद्देश नाही, असंही उदय सामंत म्हणाले.

 

सकाळपासून टीका टिप्पणी करणारे हे कुठेही नव्हते. दाऊदशी संबंध असणारे मंत्री जेलमध्ये तेव्हा त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतलना नाही.
त्यामुळे आता त्या लोकांना राजीनामा मागण्याचा अधिकार नसल्याचे सांगत सामंत यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला.

 

 

Web Title :-  Maharashtra Politics News | babri masjid was demolished by shiv sainiks said shinde faction leader sanjay shirsat

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | भगवान गडावर राजकीय वाद, पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात खडाजंगी

CM Eknath Shinde | ‘मी चंद्रकांत पाटलांशी बोललो… त्यांची बाळासाहेबांबद्दल भूमिका स्पष्ट आहे’, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | सहकारी पक्षांशी चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यामुळे..; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Related Posts