IMPIMP

Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण, अखेर मुंडे बहिण भावाच्या संघर्षाला पूर्णविराम!

by nagesh
Maharashtra Politics News | will pankaja munde and dhananjay munde get together end of sister brother conflict

बीड : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | संत भगवान बाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताला भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP
Leaders Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjaya Munde) यांच्यात मनोमिलन झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मुंडे बहिण
भावाताली संघर्षाची (Munde Sister Brother Conflict) दरी कमी झाल्याची घोषणा दोघांनी व्यासपीठावरुन (Maharashtra Politics News) केली. सत्ता संघर्षात मुंडे बहिण भावातील संघर्ष संपूर्ण राज्याला परिचित होता. मात्र, याच संघर्षाला भगवान गडाच्या (Bhagwan Gad) पायथ्याशी असलेल्या भारजवाडी गावात पूर्णविराम मिळाल्याची कबुली दोघा बहिण भावाने दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाऊ मोठा झाला तर आनंदच – पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या, माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे, असे म्हणत त्यांनी या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून पंकजा मुंडे यांच्या विधानाला साद दिली. धनंजय नंतर चार वर्षांनी माझा जन्म झाला. त्याचं काहीतरी कारण असेल. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असतील तर काय झालं दोघेही आम्ही (Maharashtra Politics News) पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम वेगळा माझा वेगळा, त्याचा पक्ष वेगळा माझा वेगळा. मात्र दोघं एकाच पाठीवरती जन्माला आलो. आमचे भविष्य काही वेगळं असेल, त्यासाठी काही वेळ वाट पहा, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले.

 

घरातल्या संवादात अंतर नसले पाहिजे – धनंजय मुंडे
पंकजा मुंडे यांचे भाषण झाल्यानंतर धनंजय मुंडे बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी देखील मनोमिलनाची री पुढे ओढली. ते म्हणाले, आमच्या दोघा बहिण भावाच्या नात्यांमधील काही गज का होईना अंतर या नारळी सप्ताहात कमी झाले, अशी स्पष्ट कबुली धनंजय मुंडे यांनी दिली. आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचाराने काम करतो. विचारांमध्ये भलेही कोसवांतर दूर असलो तरी चालेल पण घरामधल्या संवादामध्ये एक तसूभर सुद्धा अंतर नसले पाहिजे. ते अंतर कमी झालं, मुंडे कुटुंबातील गडाच्या भक्ती संदर्भात कोणीही संशय घेण्याचं कारण नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी गडाच्या वादाला पूर्णविराम दिला.

 

आमच्यात सुईच्या टोका एवढंही वैर नाही
मोठा भाऊ या नात्याने लहान बहीणीनी ने जे भगवान गडासाठी करायला सांगितलं ते मी सर्व काही करेल. आमच्या विचाराच्या वाटण्या आहेत. आमचं एक सुईच्या टोका एवढंही वैर नाही. राजकीय विचारांच्या वाटण्या आहेत, असं म्हणत धनंजय मुंडेंनी संघर्षाला पूर्णविराम दिला. यावेळी तुम्ही दोघे एकत्रित या अशी मागणी एकाने केली. त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, जे होते ते बऱ्यासाठी होतं. पंकजाताई दोन वेळ आमदार झाल्या, मंत्री झाल्या. त्याच पद्धतीने मी आमदार झालो मंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो. अस झालं नसतं तर दोघापैकी कोणीतरी एकच मंत्री झाला असता,
असं तुम्ही समजून घ्या म्हणत त्यांनी आम्ही दोघे एकच असल्याचे संकेत दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics News | will pankaja munde and dhananjay munde get together end of sister brother conflict

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, शिवसेनेच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

Maharashtra Politics News | भगवान गडावर राजकीय वाद, पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात खडाजंगी

CM Eknath Shinde | ‘मी चंद्रकांत पाटलांशी बोललो… त्यांची बाळासाहेबांबद्दल भूमिका स्पष्ट आहे’, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

 

Related Posts