IMPIMP

Pune Crime News | विमान नगर : अल्पवयीन मुलींचा स्पोर्टस क्लासला विनयभंग करणार्‍या पीटी शिक्षकावर गुन्हा दाखल

by sachinsitapure
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | शारीरीक शिक्षणाचा क्लास सुरु असताना १० वर्षाच्या मुलींच्या शरीरावरुन वाईट उद्देशाने हात फिरवून शिक्षकाने (Teacher) विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत एका मुलीच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४५८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संजय देशमुख (रा. दादाची वस्ती, लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २६ ऑगस्ट पर्यंत घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा लोहगाव येथील शाळेत शारीरीक शिक्षणाचे (Physical Education) शिक्षक आहेत. फिर्यादी यांची १० वर्षाची मुलगी शाळेमध्ये असताना दोन आठवड्यापूर्वी आरोपीने स्पोर्टस क्लासचे वेळी मैदानावर त्याचे एल्बोने मुलीच्या शरीराला वाईट उद्देशाने हात फिरविला. तसेच तिच्या मैत्रिणीच्या शरीराला वाईट उद्देशाने स्पर्श करुन तिला पीटी क्लास कसा वाटला, असे विचारुन अश्लिल कृत्य केले. पोलीस उपनिरीक्षक चौधरी (PSI Chaudhary) अधिक तपास करीत आहेत.

 

Related Posts