IMPIMP

Pune Crime News | झाडताना कचरा उडाल्याने गुंडांनी पालघनने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

by sachinsitapure
Samarth Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कार्यालयासमोरील रस्त्यावर झाडु मारत असताना बाजूला होण्यास सांगूनही न होता, कचरा उडाला म्हणून गुंडाने साथीदारांच्या मदतीने तरुणावर पालघनने वार करुन त्यांना जबर जखमी केले. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

या घटनेत भूषण रामचंद्र पांगुडवाले (वय ४०, रा. गवळीवाडा, खडकी बाजार) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) शाहरुख ऊर्फ सुलतान कासम बागवान Shah Rukh aka Sultan Kasam Bagwan (वय २६), मोहसीन कासम बागवान Mohsin Kasam Bagwan (वय ३३) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना खडकी बाजार येथील दर्गा वसाहतीत सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडली होती. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन भूषण पांगुडवाले यांचा जबाब नोंदविला आहे. फिर्यादी यांचे दर्गा वसाहत येथे भूषण केबल्स नावाने कार्यालय आहे. ते सोमवारी सायंकाळी कार्यालयासमोरील रोडवर झाडु मारत होते. त्यावेळी शाहरुख बागवान हा तेथे दुकानासमोर थांबला होता. फिर्यादी यांनी त्यास मला झाडू मारायचा आहे, तु पलीकडे बाजूस थांब असे म्हणाले. त्यावर शाहरुख हा अरे थांब माझ्या अंगावर कचरा उडतोय असे म्हणाला. तेव्हा फिर्यादी यांनी मी तुला दोन वेळा सांगितले, तरी तू जात नाही असे म्हणाले. त्यावर शिवीगाळ करुन शाहरुख निघून गेला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता फिर्यादी दुकानाबाहेर थांबले असताना शाहरुख हातात पालघन घेऊन हवेत फिरवत आला. त्याचा भाऊ मोहसिनही बरोबर होता.

त्यांना पाहून फिर्यादी हे दुकानात परत जात असताना शाहरुख याने पालघनने त्यांच्या मानेवार वार केला.
त्यांनी तो चुकवून हातावर झेलला. पाठीमागून मोहसिन याने त्यांच्यावर वार केला.
त्यांच्याबरोबरील अल्पवयीन मुलाने लाकडी दांडक्याने पाठीवर, मानेवर, हातावर मारहाण (Beating) करुन गंभीर
जखमी केले. खडकी पोलिसांनी (Pune Police) खूनाचा प्रयत्न केल्याचा (Attempted Murder) गुन्हा दाखल केला
असून दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ (PSI Gunjal) तपास करीत आहेत.

Related Posts