IMPIMP

Pune Crime News | वानवडी पोलिस स्टेशन : आर्मीच्या सुरक्षा रक्षकासह दोघांना तिघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले

by nagesh
Pune Crime News | Wanwadi police station: Army security guard and two robbed by three thieves at knifepoint

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | लष्करात सुरक्षा रक्षकासह (Army Security Guard) नाईक असलेल्या दोघांना तिघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड व मोबाईल जबरदस्तीने (Robbery In Pune) चोरुन नेले. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी परशुराम बसप्पा नागराळ (वय ३९, रा. आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्युट, मुंढवा) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार घोरपडी येथील सोपानबागेजवळील छोटा कॅनॉल रोडवर ८ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

फिर्यादी हे स्पोर्ट इन्स्टिट्युट मुंढवा (Sport Institute Mundhwa)
येथे चालक म्हणून नोकरीला आहेत. ते सायकलवरुन घरी जात होते.
तेव्हा एका सुरक्षा रक्षकाला तिघे जण पकडून मारत होते. फिर्यादीला पाहून त्यांच्यातील एकाने दगड उचलून त्यांच्या पाठीत मारला. त्यानंतर तिघांनी फिर्यादी यांना पकडून त्यांची सायकल कॅनॉलमध्ये फेकून दिली. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड देण्यास भाग पाडले. तसेच सुरक्षा रक्षक मोहीत छोटेलाल साकेत याला हाताने मारहाण (Beating) करुन त्यांच्याकडील मोबाईल व दीडशे रुपये जबरदस्तीने काढून घेऊन तिघे जण पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक शितोळे (PSI Shitole) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Wanwadi police station: Army security guard and two robbed by three thieves at knifepoint

Related Posts