IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे माळवाडी पोलीस स्टेशन- अनाथ अल्पवयीन मुलीवर 5 वर्षे बलात्कार करणारा अटकेत

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station- Rape of orphan minor girl for 5 years arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मामाच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या अनाथ अल्पवयीन मुलीला धमकावून एकाने बलात्कार (Pune Minor Girl Rape Case ) केल्याची घटना उघडकीस आली. गेल्या पाच वर्षांपासून अल्पवयीन मुलीला धमकावून आरोपी बलात्कार (Rape In Pune) करत असल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

रघुनाथ बोरकर Raghunath Borkar (वय ५१) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका युवतीने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे.

बोरकरविरुद्ध बलात्कार (Rape Case), बाललैंगिक अत्याचार (Child Sexual Abuse)
विरोधी कायद्यातील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार युवती अनाथ आहे. ती अल्पवयीन होती.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

तेव्हा मामाच्या घरी शिक्षणासाठी आली होती. सप्टेंबर २०१८ ते जून २०२३ या कालावधीत बोरकरने तिला वेळोवेळी धमकावले. भावाला मारहाण (Beating) करेल. मामाचे घर उध्वस्त करेल, अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. ती अनाथ असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करत होता. दारु पिऊन सातत्याने बलात्कार करीत असल्याने त्रासलेल्या या युवतीने कर्वेनगरमधील आपल्या शिक्षिकेच्या कानावर हा प्रकार घातला.
तिने चुलत भावाला बोलावून सर्व सांगितल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Web Title : Pune Crime News | Warje Malwadi Police Station- Rape of orphan minor girl for 5 years arrested

Related Posts