IMPIMP

Pune Crime | भाडेतत्वावर मोटार घेऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 30 लाखांच्या 8 मोटारी जप्त

by Team Deccan Express
Pune Crime News | SS cell of the pune police crime branch raided a gambling den in Chandannagar area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | भाडेतत्वावर चालवण्यासाठी चारचाकी घेऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सुमित यादवराव खेरडे Sumit Yadavrao Kherde (वय 30 रा. वाकड, मुळ- गनोरी, माळीपुरा वस्ती, ता. बाभुळगाव, यवतमाळ) आणि गणेश तुकाराम भालसिंग Ganesh Tukaram Bhalsingh (वय 31 रा. सोनिवडी रोड, केडगाव, नगर) यांना अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून 30 लाख रुपये किमतीच्या 8 मोटारी जप्त केल्या आहेत. आरोपींनी सर्व सामान्य लोकांना विश्वासात घेऊन त्यांची फसवणूक (Cheating) केल्याचे तपासात निष्पन्न (Pune Crime) झाले आहे.

 

याबाबत महेश बाळकृष्ण सुर्यवंशी Mahesh Balkrishna Suryavanshi (वय-26 रा. आंबेगाव पठार) यांनी तक्रार केली आहे.
फिर्यादी यांनी त्यांची चारचाकी गाडी भाडेतत्वावर लावण्यासाठी महेश सूर्यवंशी (Mahesh Suryavanshi) आणि प्रशांत पाटील
(Mahesh Suryavanshi and Prashant Patil) यांच्याकडे दिली होती.
परंतु गाडीचे भाडे थकवून त्यांनी गाडी परस्पर दुसऱ्याला वापरण्यास देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने केला.
पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी सुमित खेरडे व गणेश भालसिंग यांना ताब्यात घेऊन 30 लाखाच्या 8 चारचाकी जप्त केल्या.(Pune Crime)

 

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम (Senior Police Inspector Rajendra Kadam),
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके (PSI Shubhangi Narke), शाहिद शेख, निलेश शिवतरे, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश ढगे,
गणेश पाटोळे, श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, ऋषिकेश कोळप, अक्षय गायकवाड, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch exposes racket, car part sells it to each other, seizes 8 cars worth Rs 30 lakh

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts