IMPIMP

Pune Crime | पतीच्या मित्रानेच केला घात, बलात्कार करुन उकळले पैसे; लातूर जिल्हयातील चापोलीजवळील ऐनगेवाडीतील कृष्णा कासलेविरूध्द पुण्यात गुन्हा

by nagesh
Pune Pimpri Crime News | Abuse of a widow by luring her into marriage; Incidents in Bhosari area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  –  Pune Crime | कामासाठी पुण्यात आलेल्या मित्राला घरात राहण्यासाठी ठेवून घेतले. मात्र मित्राने याचा गैरफायदा घेत मित्राच्या पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड (Bathing Video) केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी (Video Viral Threatening) देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केले. तसेच तिच्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) वाघोली परिसरात एप्रिल 2022 ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 27 वर्षीय पीडित महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कृष्णा रामदास कासले Krishna Ramdas Kasle (वय- 25 रा. ऐनगेवाडी, चापोली, ता.जि. लातुर) याच्यावर आयपीसी 376, 354 अ, 384, 385 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित महिलेच्या पतीचा गावाकडचा मित्र (Village Friend) आहे.
तो नोकरीनिमित्त पुण्यात आला होता. त्याला रहायला जागा नसल्याने महिलेच्या पतीने त्याला घरात ठेवून घेतले.
परंतु मित्राने याचा गैरफायदा घेतला. मित्र कामावर गेल्यानंतर त्याने मित्राच्या पत्नीचा आंघोळ करतानाचा
व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने महिलेसोबत जबदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

 

आरोपीने महिलेला आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सुरुवातीला 50 हजार रुपये घेतले.
त्यानंतर त्याने आणखी साडेतीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर बदनामी करण्याची धमकी दिली.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपी कृष्णा कासले याच्यावर बलात्कार (Rape), विनयभंग (Molestation),
खंडणीचा (Extortion) गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे (PSI Rahul Kolpe)
करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | The husband’s friend committed the assault, raped and extorted money; Crime in Pune against Krishna Kasle yengewadi near Chapoli in Latur district

 

हे देखील वाचा :

Blood Sugar वाढल्याने किडनी फेल होण्याचा धोका! स्वत:ची ‘या’ ५ प्रकारे घ्या काळजी

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! तरुणीचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो एडीट करुन इंन्स्टाग्राम केला व्हायरल, नाशिकमधील आरोपीवर FIR

Sanjay Raut | ‘आज पुणे बंद आहे, हळूहळू महाराष्ट्र बंद होईल; पुणे बंदची दखल केंद्र सरकारने घ्यावी’ – संजय राऊत

 

Related Posts