IMPIMP

Blood Sugar वाढल्याने किडनी फेल होण्याचा धोका! स्वत:ची ‘या’ ५ प्रकारे घ्या काळजी

by nagesh
Blood Sugar | increasing blood sugar can cause the kidney failure know the details

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Blood Sugar | मधुमेह म्हणजे डायबिटीज (Diabetes) हा एक असा आजार आहे, ज्यामुळे संपूर्ण आयुष्य पथ्य पाळण्यात व्यतित होते. आजच्या जीवनशैलीत तरुणांमध्येही मधुमेहाचा धोका वाढला आहे. खरे तर मधुमेह हा असाध्य आजार आहे. त्यावर नियंत्रण न ठेवल्यास सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मधुमेहावर योग्य वेळी उपचार न केल्यास किडनी निकामी होण्याचा धोका असतो. परंतु, काही सोप्या टिप्स फॉलो करून मधुमेही रुग्ण आपली किडनी (Kidney) निरोगी ठेवू शकतात. (Blood Sugar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

१. शुगर ठेवा कंट्रोल (Blood Sugar Control)
मधुमेहाच्या रुग्णांनी ब्लड शुगर कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे. ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्याने किडनीचा आजार होण्याची शक्यता वाढते. किडनीशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी ब्लड शुगरवर कंट्रोल ठेवणे आवश्यक आहे.

 

२. डाएटमध्ये करा जांभळचा समावेश
जांभूळ आणि त्याची पाने ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हेल्थ लाइननुसार, दररोज सुमारे १०० ग्रॅम जांभूळ खाल्ल्याने तुमची ब्लड शुगर लेव्हल सुधारू शकते.

 

३. व्हिटॅमिन C घ्या (Vitamin c)
व्हिटॅमिन सी केवळ त्वचेसाठीच नाही तर मधुमेहासाठीही चांगले आहे. अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की दररोज सुमारे ६०० मिलिग्राम व्हिटॅमिन सी घेतल्याने ब्लड शुगर लेव्हल लक्षणीय सुधारू शकते. तुम्ही संत्री, टोमॅटो आणि आवळा खाऊ शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

४. शिमला मिरची
रंगीबेरंगी शिमला मिरचीमध्ये इतर भाज्यांपेक्षा कमी पोटॅशियम असते, ज्यामुळे ते किडनीच्या रुग्णांसाठी चांगले अन्न आहे. याशिवाय सिमला मिरची हे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. सिमला मिरची इम्युनिटी वाढवण्यासही मदत करते.

 

५. जास्त ताण घेऊ नका
अनेकदा डॉक्टरही मधुमेहाच्या रुग्णांना तणाव कमी करण्याचा सल्ला देतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तणाव किंवा नैराश्य चांगले मानले जात नाही.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Blood Sugar | increasing blood sugar can cause the kidney failure know the details

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! तरुणीचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो एडीट करुन इंन्स्टाग्राम केला व्हायरल, नाशिकमधील आरोपीवर FIR

Sanjay Raut | ‘आज पुणे बंद आहे, हळूहळू महाराष्ट्र बंद होईल; पुणे बंदची दखल केंद्र सरकारने घ्यावी’ – संजय राऊत

Pune Crime | अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पतीच्या मित्राकडून बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

 

Related Posts