IMPIMP

Pune Crime | पुण्यात चोरट्यांची दिवाळी जोरात, कर्वेनगर, हडपसरमध्ये घरफोडी; 15 लाखांचा ऐवज लंपास

by nagesh
Burglary Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) निमित्ताने पूजा करण्यासाठी आणलेल्या दागिन्यांवर (Gold Jewellery) चोरट्यांनी डल्ला मारला. कर्वेनगरमध्ये घरफोडी (Burglary) आणि हडपसर मधील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी 15 लाखांचा ऐवज चोरून नेला. कर्वेनगरमधील बंगल्यात शुक्रवारी रात्री अकरा ते सकाळी सहा वाजण्याच्या (Pune Crime) सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी  गौरव होनराव (Gaurav Honrao) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) तक्रार दिली आहे.

 

धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीचे दागिन्यांचे (Gold – Silver Jewellery) पूजन केले जाते. त्यासाठी कर्वेनगरमधील तरूणाने  बँकेच्या लॉकरमधून सोन्याचे व चांदीचे दागिने घरी आणले होते.  विधिवत पूजन केल्यानंतर  होनराव कुटुंब रात्री झोपले. मात्र, त्यांनी बंगल्याचा दरवाजा पूर्णपणे लॉक केला नाही. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी आत प्रवेश करत देवघरातील 7 लाख 93 हजार 800 रुपये रुपये किंमतीचे 226 ग्रॅम सोन्याचे व पन्नास ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले. पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे (PSI Rameshwar Parve) या गुन्ह्याचा तपास करत आहेत.(Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उंड्रीतील कानडे नगर परिसरातील किराणा दुकानासह गोदामाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी तेलाचे डबे, शीतपेयांचे बॉक्स, काजू, बदाम, असे 89 हजार 750 रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत गोदामाच्या मालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बिराजदार (PSI Brajdar) तपास करत आहेत.

 

हडपसरमध्ये 40 मोबाइल चोरीला

धनत्रयोदशीच्या दिवशी हडपसर परिसरातील मोबाइल विक्री दुकानाच्या शटर वरील खिडकी तोडून चोरट्यांनी 7 लाख 18 हजारांचे 40 मोबाइल चोरून नेले.
याबाबत दुकान चालकाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार चोरट्यांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) तपास करत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Thieves’ Diwali rampage in Pune, house burglaries in Karvenagar, Hadapsar; 15 lakhs instead of lumpas

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना आता घरात करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर फिरायला गेले, भाजपच्या माजी मंत्र्याचा घणाघात

CM Eknath Shinde | ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात CM शिंदेंची शाब्दिक आतषबाजी, म्हणाले – भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही सामना खेळलो आणि…

Pune Crime | कात्रज परिसरातील मांगडेवाडीतून 10 लाखांचा चरस जप्त, तस्कराला अटक

 

Related Posts