IMPIMP

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा सपासप वार करून खून; इंजिनिअर पती गजाआड, हडपसर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | wife murdered by engineer husband over suspicion of character in pune within hadapsar police station limits

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा धारदार चाकूने वार करून खून केल्याची घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. ही घटना (Pune Crime) आज सकाळी उघडकीस आली असून, पोलिसांनी इंजिनिअर असलेल्या पतीला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार फुरसुंगीतील भेकराईनगर येथे घडला आहे.

 

ज्योती राजेंद्र गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय 31) याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड दाम्पत्य भेकराईनगर येथील गुरुदत्त कॉलनी भक्तनिवास येथे राहते. राजेद्र हा इंजिनिअर आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजेंद्र हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते.
आज सकाळी याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाले. रागाच्या भरात राजेंद्रने पत्नीवर चाकूने सपासप वार केले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन पत्नीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पाठवून आरोपी पतीला ताब्यात घेतले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | wife murdered by engineer husband over suspicion of character in pune within hadapsar police station limits

 

हे देखील वाचा :

Maharashtra Government Holidays | नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना 24 सार्वजनिक सुट्ट्या; अजित पवार मात्र नाराज, जाणून घ्या

Chandrashekhar Bawankule | ‘ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढून ती आपल्या पक्षाची म्हणून जाहीर करावी’ – चंद्रशेखर बावनकुळे

Kalyan Crime | कल्याणमध्ये डॉक्टर दाम्पत्याला 56 लाखांचा गंडा; 4 विकसकांवर आरोप

 

Related Posts