IMPIMP

Pune Cyber Crime | कॉसमॉस बँकेप्रमाणे भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला ! दुसर्‍या बँकेची 439 कार्ड क्लोन करुन 1 कोटी रुपये हडपले

by sachinsitapure
Pune Cyber Crime | cyber attack on bharti sahakari bank like cosmos bank another banks 439 card-was cloned and rs 1 crore was stolen

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Cyber Crime | कार्ड क्लोन (Card Clone) करुन एकाचवेळी भारतातील व जगभरातील अनेक देशातील एटीएममधून पैसे काढून कॉसमॉस बँकेवर (Cosmos Bank) जसा सायबर हल्ला (Cyber Attack) करण्यात आला होता. काहीशा तशाच पद्धतीचा सायबर हल्ला भारती सहकारी बँकेवर (Bharati Sahakari Bank Ltd) करण्यात आला होता. बँकेच्या एटीएममधून (Bank ATM) तब्बल १ कोटी ८ लाख रुपये काढून नेण्यात आले. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार तीन वर्षांपूर्वी घडला असला तरी बँकेला त्याचा पत्ताच लागला नाही. (Pune Cyber Crime)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी भारती सहकारी बँकचे व्यवस्थापकीय संचालक सर्जेराम जगन्नाथ पाटील Sarjeram Jagannath Patil (वय ६२, रा. धनकवडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६८/२३) दिली आहे. हा प्रकार १७ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान राज्यातील विविध ठिकाणच्या भारती बँकेच्या एटीएममध्ये घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती सहकारी बँकेच्या सदाशिव पेठेतील (Bharati Sahakari Bank Ltd Sadashiv Peth) मुख्य शाखा (Main Branch) तसेच इतर ठिकाणच्या एटीएम मशीनमधून ४३९ एटीएम डेबीट कार्ड क्लोन (Debit Card Clone) करुन १२ ४७ ट्रान्झेक्शन केली. त्याद्वारे तब्बल १ कोटी ८ लाख १५ हजार ७०० रुपयांची रक्कम काढून घेऊन बँकेची फसवणूक (Cheating Case) करण्यात आली. (Pune Cyber Crime)

कोरोना काळात एटीएमची चीप बसविण्याच्या कामात उशीर झाला. त्याची माहिती आरोपींना असल्याचा संशय आहे.
सायबर चोरट्यांना याची माहिती असावी, असा संशय आहे. त्यांनी दुसर्‍या बँकेची ४३९ डेबिड कार्डचे क्लोन केले.
त्याचा वापर करुन भारती सहकारी बँकेच्या आकुर्डी, धायरी, धनकवडी, सांगली, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, मलकापूर,
दिल्ली, इस्लामपूर, कोथरुड, वरळी, बाणेर व हडपसर येथील एटीएम मशीन मधून
क्लोन कार्डांचा वापर करुन १ हजार २४७ व्यवहार करुन १ कोटी ८ लाख १५ हजार ७०० रुपये काढून घेतले.
पण ही बाब ना क्लोन कार्ड केलेल्या बँकेच्या लक्षात आली, ना भारती सहकारी बँकेच्या.
आता अ‍ॅडिट सुरु असताना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यावर हा प्रकार उजेडात आला.
पोलीस उपनिरीक्षक बरुरे (PSI Barure) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Cyber Crime | cyber attack on bharti sahakari bank like cosmos bank another banks 439 card-was cloned and rs 1 crore was stolen

हे देखील वाचा

Related Posts