IMPIMP

Pune Cyber Crime | पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समाजमाध्यमांवर बदनामी; गुन्हा दाखल

by nagesh
Pune Cyber ​​Crime | Defamation of Chief Minister Eknath Shinde on social media in Pune; Filed a case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Cyber Crime | महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री,लोकनेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह बदनामीकारक मजकूर प्रसारित करून विद्वेष पसरविणाऱ्या आरोपीवर गुन्हे दाखल (Pune Cyber Crime) करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी पुणे शहर शिवसेना, युवासेना,महिला आघाडी व शेकडो शिवसैनिकांच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. (Eknath Shinde’s Defamation On Social Media In Pune)

अभय नामक ट्विटर अकाउंट वरून गेल्या अनेक दिवसांपासून बदनामीकारक मजकूर, मॉर्फ केलेले फोटो तसेच आक्षेपार्ह लिखाण केले जात असून मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या या नराधमावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज पुणे पोलीस आयुक्तालयात शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी एकवटले होते. पोलीस आयुक्तांनी आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून सदर आरोपीवर आयपीसी ऍक्ट 469,499,500 नुसार सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Cyber Crime)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire),
सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले (Ajay Bapu Bhosale), जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे
(Ramesh Bapu Konde), शहर संघटक श्रीकांत पुजारी (Shrikant Pujari),
महिला आघाडी शहरप्रमुख लिनाताई पानसरे, उपशहरप्रमुख विकास भांबुरे, सुधीर कुरुमकर, संजय डोंगरे, विकी माने, संतोष राजपूत, माथाडी जिल्हाप्रमुख निलेश माझीरे, युवासेना उपशहर प्रमुख गौरव साईनकर, उपशहर प्रमुख महिला आघाडी चैत्राली गुरव, उपशहरप्रमुख संघटिका श्रद्धा शिंदे, शहर संघटक प्रमोद प्रभुणे, गणेश काची, विभाग प्रमुख अक्षय तारू, मयूर पानसरे, नितीन लगस, निखिल पवार, शंकर संगम, नेहा शिंदे, उपविभाग प्रमुख संदीप धुमाळ, डेविड खोडे, सचिन चव्हाण, नवनाथ निवंगुणे, प्रभाग प्रमुख कैवल्य पासलकर, अमर घुले व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title : Pune Cyber ​​Crime | Defamation of Chief Minister Eknath Shinde on social media in Pune; Filed a case

Related Posts