IMPIMP

Pune Kothrud Crime | पुणे : स्वस्तात साखर देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला 45 लाखांचा गंडा, व्हीडीपी स्वाद फुडस प्रा. लि. कंपनीच्या दोन संचालकांना अटक

by sachinsitapure
arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Kothrud Crime | दुकानात व्यावसायिक म्हणून येऊन वेगवेगळ्या योजना सांगून कमी दरात सारख देतो असे आमिष दाखवून 45 लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) व्हीडीपी स्वाद फुडस प्रा. लि. कंपनीच्या (Vdp Swaad Foods Private Limited) दोन संचालकांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार जून 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत कथरुड भागातील भेलकेनगर येथील श्री बालाजी ट्रेडिंग (Shree Balaji Trading) कंपनीत घडला आहे.

याबाबत सुनिल शिवारामजी गेहलोत (वय-38 रा. भेलकेनगर, सखाई प्लाझा, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन व्हीडीपी स्वाद फुडस प्रा. लि. कंपनीचे संचालक विक्रम दिनकर पाटील Vikram Dinkar Patil (वय-41 रा. अजिंक्यनगर, सांगली), दिग्विजय दिनकर पाटील Digvijay Dinkar Patil (वय-38 रा. डफापुरे प्लॉट, सांगली) यांच्यावर आयपीसी 409, 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Kothrud Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भेलकेनगर येथे श्री बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. जुन 2023 मध्ये आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात व्यापारी म्हणून आले. त्यांनी वेगवेगळ्या योजना सांगून कमी दरात साखर देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला फिर्यादी यांच्याकडून साखरेची ऑर्डर घेऊन त्यांना साखरेचा पुरवठा केला.

यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 45 लाख रुपयांची 150 टनाची साखरेची ऑर्डर घेतली.
ऑर्डरची रक्कम व्हीडीपी स्वाद फुडस प्रा. लि. कंपनीच्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर करुन घेतेली.
मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपींनी ठरल्याप्रमाणे साखर दिली नाही. तसेच घेतलेली रक्कम परत केली नाही.
फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता त्यांना धनादेश दिले. परंतु, आरोपींनी पेमेंट स्टॉप करुन फिर्यादी यांची
45 लाखांची फसवणूक केली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आळेकर करीत आहेत.

Related Posts