IMPIMP

Pune Molestation Case | पुणे : अल्पवयीन मुलीवर लग्नासाठी दबाव, आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

by sachinsitapure
Rape Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Molestation Case | अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिला लग्नाची मागणी घातली. तसेच लग्नास नकार दिलातर आत्महत्या करण्याची धमकी देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा फेब्रुवारी 2024 पासून 7 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान पीडित मुलीच्या घराजवळ घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने रविवारी (दि.10) सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओंकार रवि शिंदे Omkar Ravi Shinde
(वय-20 रा. मानाजीनगर, वडगाव, पुणे) याच्यावर आयपीसी 354ड, 506, पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे (Molestation Case). पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीचा वारंवार पाठलाग केला. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु मला हो म्हण, नाहीतर मी फाशी घेईन, अेस म्हणून मुलीवर दबाव टाकून धमकी दिली. तसेच तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Molestation Case)

अश्लिल मेसेज करुन विवाहितेचा विनयभंग (Harassing a married woman by sending obscene messages)

पुणे : विवाहित महिलेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन व्हॉट्सअॅपवर वारंवार अश्लील मेसेज करुन महिलेच्या
स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी 34 वर्षीय पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात
फिर्य़ाद दिली आहे. यावरुन प्रकाश कदम (रा. आंबेगाव बु.,) याच्यावर आयपीसी 354 (अ) (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हा 7 ते 8 मार्च या कालावधीत आंबेगाव बुद्रुक येथे घडला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts