IMPIMP

Pune-Mahavitaran | महापारेषणकडून पूर्वनियोजित दुरुस्ती कामे; शिवाजीनगर, डेक्कन परिसरात ‘या’ दोन दिवशी वीजपुरवठा बंद राहणार

by nagesh
Pune-Mahavitaran | Pre-planned repair works by Mahapareshan; The power supply will be off for these two days in Shivajinagar, Deccan area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune-Mahavitaran | औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या १३२ केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोरे उभारणीचे व इतर दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. १ डिसेंबर) सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच रविवारी (दि. ४ डिसेंबर) सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत शिवाजीनगर, डेक्कनमधील काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. (Pune-Mahavitaran)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत माहिती अशी की, गणेशखिंड येथे महापारेषणचे १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला गणेशखिंड ते चिंचवड आणि गणेशखिंड ते रहाटणी या अतिउच्चदाब १३२ केव्ही वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र या दोन्ही वीजवाहिन्यांचे मनोरे व तारांमुळे औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी महापारेषण कंपनी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने नवीन मोनोपोल टॉवर उभारण्यात येणार आहे. (Pune-Mahavitaran)

 

दोन टप्प्यांमध्ये नवीन टॉवर उभारणी व १३२ केव्ही वीजवाहिन्यांच्या इतर तांत्रिक कामांमुळे महापारेषणच्या गणेशखिंड १३२ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे महावितरणच्या ११ केव्ही व २२ केव्ही क्षमतेच्या एकूण ३२ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहेत. यात शिवाजीनगरमधील २८ तर कोथरूड विभागातील ४ वीजवाहिन्यांचा समावेश आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कामाच्या वेळेत शिवाजीनगर परिसरातील सुमारे ३८ हजार ३०० तसेच डेक्कन व जंगली महाराज रोड परिसरातील सुमारे ८ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव बंद ठेवावा लागणार आहे.

 

पहिल्या टप्प्यात गुरुवारी (दि. १) सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच दुसऱ्या टप्प्यात रविवारी (दि. ४)
सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत शिवाजीनगर व डेक्कनच्या काही भागात वीजपुरवठा बंद राहील. यामध्ये एफसी रस्ता,
वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग १, रेंज हिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर, लकाकी रस्ता,
सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, मंगलवाडी, वेताळबाबा चौक, राजभवन, खैरेवाडी, अशोकनगर,
यशवंत घाडगेनगर, पोलीस लाईन वसाहत, घोले रस्ता, शिवाजीनगर गावठाण, काँग्रेस भवन, सावरकर भवन,
जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, तोफखाना, मंगला टॉकीज, आयआयटीएम, कॅस्टेल रॉयल टॉवर, काकडे मॉल,
एसएसपीएमएस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, आकाशवाणी, शिमला ऑफीस, सीआयडी वसाहत, संचेती हॉस्पीटल,
लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ व सदाशिव पेठचा काही भाग, चित्रशाला, आपटे रस्ता, शिरोळे रस्त्याचा अर्धा भाग, जंगली महाराज रस्ता, पुलाची वाडी, छत्रपती चौक, आयएमडीआर कॉलेज, गणेशवाडी आदींचा समावेश आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावर नवीन मनोरे व अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक
कामामुळे नागरिकांनी गुरुवारी व रविवारी वीज बंदच्या पूर्वनियोजित वेळेत सहकार्य करावे असे आवाहन
महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune-Mahavitaran | Pre-planned repair works by Mahapareshan; The power supply will be off for these two days in Shivajinagar, Deccan area

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | सीमावादावरुन संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘त्या लोकांना घालवण्यासाठी पुन्हा…’

MNS Chief Raj Thackeray | आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो, आम्हाला कोणी मते देत नाही – राज ठाकरे

Anupam Kher | काश्मीर फाइल्सवर झालेल्या टीकेनंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत दिले ‘हे’ प्रतिउत्तर

 

Related Posts