IMPIMP

MP Sanjay Raut | सीमावादावरुन संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘त्या लोकांना घालवण्यासाठी पुन्हा…’

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut hilarious comment trolls cm eknath shinde being inactive in amruta fadnavis blackmailing case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – MP Sanjay Raut | काही दिवसांपूर्वी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकातील सीमावाद चिघळला होता. कर्नाटक सरकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या चाळीस गावांवर दावा करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते. त्यानंतर विरोधीपक्ष, विशेषतः शिवसेनेने शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आज पुन्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

 

जत तालुक्यातील उमराडी गावात कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या काही लोकांनी झेंडे फडकावले होते. त्याबद्दल संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी विचारले असता. ते म्हणाले, खरंतर याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काय वाटतं, हे त्यांना विचारायला हवं. ज्या दोन मंत्र्यांना सीमाभागासंदर्भातलं काम दिलंय ते चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे तीन तारखेला बेळगावला जाणार असल्याचे मी वाचलं आहे. कन्नड रक्षण वेदिकेचे लोक महाराष्ट्रात येतात, हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय येऊ शकत नाहीत. ते आपले झेंडे लावतात, हे आपल्या सरकारमधल्या काही लोकांचा छुपा पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. हे असं घडलं असेल, तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुढे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.
“तुम्ही पुन्हा गुळमुळीत धोरण स्वीकारून हात चोळत बसणार आहात का?,
दिल्लीकडे बघत बसणार आहात की त्या गावात घुसून झेंडे लावणाऱ्या लोकांना घालवण्यासाठी पुन्हा आसामला जाऊन नवस करणार आहात, हे एकदा सांगा”,
असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लावला.
महाराष्ट्रातील वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी,
पंतप्रधान याहून मोठा प्रकल्प आपल्याला देणार आहेत, असे सांगितले होते.
तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आसामला कामाख्या देवीचा नवस फेडायला गेले आहेत.
या दोन्हीचा संदर्भ घेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

 

Web Title :- MP Sanjay Raut | shivsena sanjay raut slams cm eknath shinde on border issue

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो, आम्हाला कोणी मते देत नाही – राज ठाकरे

Rakhi Sawant | राखी सावंतचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये ड्रामा सुरू; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

MP Sanjay Raut | सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत का?, संजय राऊतांचा खोचक सवाल

 

Related Posts