IMPIMP

Pune Mumbai Expressway Accident | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यु !

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

लोणावळा : सरकारसत्ता ऑनलाइन गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मुंबई – पुणे महामार्गावरील अपघातांचं (Pune Mumbai Expressway Accident) प्रमाण वाढत चाललेलं पाहायला मिळत आहेत. अशातच मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली, ही धडक इतकी जोरात झाली की या थरारक अपघातामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर आणखी एक जण हा जखमी आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अपघातानंतर द्रुतगती मार्गावरील देवले पूल (Devale Bridge) ते ताजे पेट्रोल पंप दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली. देवले पुलाजवळ एका मार्गिकेचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे दोन मार्गिंकावरून वाहतूक सुरु आहे. या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी अपघात स्थळावर धाव घेतली.

 

अपघातग्रस्त दोन्ही ट्रक क्रेनच्या सहाय्याने सकाळी बाजूला काढण्यात आले. सकाळी दहापर्यंत या भागातील वाहतूक सुरळीत झाली. अपघातात मृत्यूमुखी पडलेला ट्रकमधील एकाचे नाव पत्ता समजू शकले नाही, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala Rural Police) दिली.

 

दरम्यान, देवले पुल मृत्युचा सापळा बनत चालला आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
आठवड्यापूर्वी देवले पुलाजवळ कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता.

 

Web Title :- Pune Mumbai Expressway Accident | One killed in Mumbai Pune expressway accident

 

हे देखील वाचा :

Kidney Stone दूर करण्याचे सोपे उपाय, रोज प्या हे 3 प्रकारचे ज्यूस

CBI Arrest SP And Inspector of Central GST In Kolhapur | 50 हजाराच्या लाचप्रकरणी GST अधीक्षकासह निरीक्षकास अटक; कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये CBI ची कारवाई

Pune Aam Aadmi Party | टँकर माफियांचा पुणे शहराला विळखा ! पाणी प्रश्नावर सवंग राजकारण नको; पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या – AAP ची मागणी

 

Related Posts