IMPIMP

Pune Aam Aadmi Party | टँकर माफियांचा पुणे शहराला विळखा ! पाणी प्रश्नावर सवंग राजकारण नको; पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या – AAP ची मागणी

by nagesh
Aam Aadmi Party Pune | Pune Municipal Corporation courtesy of city corporators and concept boards should be removed; - Demand for AAP Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Aam Aadmi Party | वाढत्या उष्मा सोबतच पुण्यात पाणी प्रश्न ही पेटू लागला आहे. पाणी पुरवठा केंद्रात (Water Supply Center) मुबलक पाणी साठा असून ही नागरिकांना मात्र पाणी विकत घ्यावे लागत आहे. या बाबत सर्व स्तरांतून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. पुणे आम आदमी पक्षाने (Pune Aam Aadmi Party) नुकतेच पुण्यात आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे. ‘टँकर मुक्त पुणे’ (Tanker free Pune) करण्याचा ध्यास ‘आप’ ने घेतला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

“टँकर माफिया मुक्त दिल्ली” या यशस्वी प्रयोगाने दिल्लीतील नागरिकांना हक्काचे वीस हजार लिटर पाणी मिळते; पुण्यात मात्र पाणी कर भरून ही नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. 800 ते 1200 रुपये प्रति टँकर दराने पैसे मोजावे लागत आहेत तर अनेक रहिवासी सोसायट्या या टँकर माफियांच्या विळख्यात सापडल्या आहेत. हे टँकर माफियांचे जाळे स्थानिक राजकीय नेत्यांच्या (Local Political Leaders) वरदहस्ताने चालते हे सर्व जण जाणतात. त्यामुळेच पुणे शहरात पाण्याचा मुबलक साठा असून ही नळाला मात्र पाणी येत (Pune Water Supply) नाही अशी खंत महिला व गृहिणी व्यक्त करीत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या भागांत पाणी पुरवठ्याचा प्रश्न गांभीर आहे. त्या भागात अजून ही पाणी पोहोचलेले नाही.

 

प्रस्थापित पक्षांनी सत्तेत असताना या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आणि आता निवडणुकांचे (Elections) वेध लागताच पाण्यासाठी आंदोलन (Agitation) वगैरे करण्याचा देखावा ते करीत आहेत. या खेरीज काही लोक सत्तेत होते तेव्हा मूग गिळून बसले होते व सत्तेतून पायउतार होताच ‘लोकांच्या पाणी प्रश्नासाठी’म्हणुन न्यायालयात धाव घेण्याचा दुटप्पीपणा करीत आहेत. अश्या दुटप्पी वृत्तीने समस्या सुटत नाही तर त्या आणखी गुंतागुंतीच्या होतात, अशी टीका पाणी प्रश्नावर अभ्यास असणारी मंडळी करतात.

 

आणखी भरीत भर म्हणुन की काय टँकर मुळे घडणाऱ्या अपघातांच्या (Accident) प्रकरणात ही वाढ झाली आहे. या टँकर माफियांची दहशत इतकी आहे की त्यांच्या passing नसलेल्या निकृष्ट दर्जाच्या वाहनाना RTO व पोलीस प्रशासन (Pune Police) कुणीही अटकाव करीत नाही. हे टँकर्स बिनबोभाट पणे रस्त्यावरून धावतात. त्यांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरी ही महानगरपालिका प्रशासन (Municipal Administration) आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागे व्हायला तयार नाही. ‘टँकर मुक्त पुणे’ हा नारा घेवून आम आदमी पक्ष (Pune Aam Aadmi Party) रिंगणात उतरला आहे. आम आदमी पक्षाने पाणी प्रश्न ऐरणीवर घेतला आहे. ज्या भागांमध्ये नळ जोडणीद्वारा पाणी पुरवठा पोहोचला नाही त्या ठिकाणी महानगरपालिकेणे स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करणे क्रमप्राप्त आहे. त्याचा भुर्दंड नागरिकांवर बसवू नये अशी मागणी ‘आप’ ने केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ज्या रहिवासी सोसायट्यांमध्ये पाणी पुरवठा केला जात नाही त्यांच्या कडून पाणीपट्टी घेण्याचा अधिकार महानगरपालिकेला नाही.
पाणी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही जाणीवपूर्वक कृत्रिम तुटवडा निर्माण करून टँकर लॉबीचे उखळ पांढरे करून दिले जात आहे
व त्यासाठी सामान्य पुणेकरांना वेठीस धरून त्यांना मूलभूत हक्क पासून वंचित ठेवले जात आहे असा आरोप आम आदमी पक्ष करीत आहे.
त्यामुळे त्या विरोधात आम आदमी पक्षाचे राज्य संघटक विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांच्या नेतृत्वाखाली येत्या
काळात तीव्र स्वरूपाचे जल हक्क आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे संकेत आपचे प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे (spokesperson Dr. Abhijeet More),
जल हक्क समितीचे सुदर्शन जगदाळे (Sudarshan Jagdale), आबासाहेब कांबळे (Abasaheb Kamble) यांनी दिला आहे.

 

Web Title :- Pune Aam Aadmi Party | Tanker mafia robs Pune city ! Don’t want politics on water issue; Give water, otherwise pay tanker – AAP demands

 

हे देखील वाचा :

Perfume Applying Tricks | शरीराच्या ‘या’ 4 विशेष भागात लावा परफ्यूम, पार्टनर होईल इम्प्रेस, जाणून घ्या कोणते

Raosaheb Danve | 2017 च्या राष्ट्रवादी-भाजप युतीच्या बंद दाराआड चर्चेचा तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केला खुलासा; म्हणाले…

Padma Vibhushan Birju Maharaj Nritya Charya Award | पहिला पद्मविभूषण पं. बिरजू महाराज नृत्याचार्य पुरस्कार प्रदान

 

Related Posts