IMPIMP

Pune Municipal Corporation (PMC) | पहिल्या निविदेचा कार्यकाळ संपण्यापुर्वीच ‘त्या’ कामाची निविदा प्रक्रिया राबवा; खातेप्रमुखांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमारांचा आदेश

by nagesh
Pune PMC News | corona testing scam worth lakhs in pune pmc pune municipal corporation attempts by senior officials to suppress the scam

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Municipal Corporation (PMC) | सध्याच्याच ठेकेदाराला मुदतवाढ मिळावी यासाठी निविदा प्रक्रिया लांबविण्याच्या प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (PMC Administrator and Commissioner Vikram Kumar) यांनी आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच चांगलाच दणका दिला आहे. पहिल्या निविदेचा कार्यकाळ संपण्यापुर्वीच त्या कामाची निविदा प्रक्रिया (Tender Process) राबविण्यात यावी, असे आदेशच सर्व विभागांना दिले आहेत. Pune Municipal Corporation (PMC)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भौगोलिक विस्ताराच्या तुलनेमध्ये महापालिकेमध्ये मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने अनेक कामांचे आउट सोर्सिंग करण्यात येते. मनुष्यबळासोबतच वाहने व अन्य साधनसामुग्री देखिल भाडेतत्वावर घेण्यात येते. प्रामुख्याने शहरामध्ये स्वच्छतेसाठी लागणारे मनुष्यबळ, सुरक्षा रक्षक, वाहन चालक आणि वाहने, अतिक्रमण विभागासाठी लागणारे मनुष्यबळ, क्लिअरीकल व चतुर्थश्रेणीतील स्टाफही कंत्राटी पद्धतीने घेण्यात येतो. यासाठी दरवर्षी अथवा दोन वर्षांतून एकदा निविदा काढण्यात येते. वरिल सेवांसाठी दरवर्षी सुमारे शंभर कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात येतो. यासोबतच महापालिकेच्या विविध वास्तू व सुविधा देखिल ठराविक काळासाठी भाडेतत्वार देण्यात येतात. तसेच विविध विभागातील मेन्टेंनन्सची कामे देखिल आउटसोर्सींगद्वारे करण्यात येतात. यावर दरवर्षी शंभर ते दीडशे कोटी रुपये खर्च येतो. Pune Municipal Corporation (PMC)

 

परंतू मागील काही काळात संबधित ठेकेदाराकडील कामाची मुदत संपल्यानंतरही नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जात नाही.
त्यामुळे कामाचा खोळंबा होउ नये यासाठी पुर्वीच्याच ठेेकेदाराला त्याच दराने कामात मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर येते.
यामध्ये अनेकदा ‘सेटींग’ करून निविदा प्रक्रिया लांबविल्या जात असल्याचेही अनेकदा उघड झाले आहे.
केवळ ‘सेवा’ खंडीत होईल अशी भिती दाखवून जाणीवपूर्वक निविदा प्रक्रिया लांबविल्याचे पाहायला मिळाले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहर स्वच्छतेसोबतच प्रशासकीय कामांतील ‘स्वच्छते’वरही भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.
पुर्वीच्या कामाची मुदत संपण्यापुर्वीच त्याच कामाची नवीन कालावधीसाठीची निविदा प्रक्रिया पुर्ण करण्याचे आदेश त्यांनी सर्वच विभागप्रमुखांना दिले आहेत.

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Conduct the tender process for that work before the expiry of the first tender period Order of Municipal Commissioner and Administrator Vikram Kumar to the department head

 

हे देखील वाचा :

Yashwant Jadhav | शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’शिवाय आणखी ‘ही’ दोन नावे, चर्चांना उधाण

Amruta Fadnavis | संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावरुन अमृता फडणवीसांचा निशाणा; म्हणाल्या – ‘मला मध्यमवर्गीय माणसाची व्याख्या सांगाल का ?’

Neha Sharma Bralette Photo | नेहा शर्माच्या सुपरबोल्ड अंदाजानं चाहत्यांना फुटला घाम, पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts