IMPIMP

Pune Municipal Corporation (PMC) | स्थायी समितीच्या मुदत संपलेल्या 8 जागांवर नवीन नियुक्त्या

भाजप, कॉंग्रेस, शिवसेनेने त्याच सदस्यांना संधी दिली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 2 माजी अध्यक्षांना उतरवले रिंगणात

by nagesh
 Pune PMC News | Only 1 thousand 734 acacia, subabhali trees will be removed in the river bank improvement plan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Municipal Corporation (PMC) | स्थायी समितीच्या (PMC Standing Committee) निवृत्त होणार्‍या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची आज खास सभेत निवड केली गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विशाल तांबे आणि अश्‍विनी कदम या दोन माजी अध्यक्षांना पुन्हा संधी दिली आहे. तर भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेसने त्यांच्या सदस्यांना पुन्हा संधी दिली आहे. आता अध्यक्ष पदाच्या निवडीकडे आणि अंदाजपत्रक सादर करण्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. विशेषत: अंदाजपत्रक सादर करण्यावरून राजकारण रंगणार हे मात्र निश्चित आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. या आठ जागांसाठी सोमवारी खास सभेत निवड झाली. प्रत्येक पक्षाकडून त्यांच्या एकुण सदस्य संख्येनुसार सदस्यांची नावे देण्यात आली होती. भाजपने त्याचे पुर्वीचे सदस्य असलेल्या नगरसेविका मानसी देशपांडे (Corporator Mansi Deshpande), सुनिता गलांडे (Corporator Sunita Galande), वर्षा तापकीर (Corporator Varsha Tapkir), उज्वला जंगले (Corporator Ujjwala Jangale) यांना पुन्हा संधी दिली. तर शिवसेना आणि कॉंग्रेसने विद्यमान सदस्य अनुक्रमे बाळा ओसवाल (Corporator Bala Oswal), लता राजगुरु (Corporator Lata Rajguru) यांना पुन्हा संधी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र, विद्यमान सदस्य नंदा लोणकर (Corporator Nanda Lonkar) आणि अमृता बाबर (Corporator Amruta Baber) यांना संधी न देता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे (Corporator Vishal Tambe) आणि अश्विनी कदम (Corporator Ashwini Kadam) यांना संधी दिली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अंदाजपत्रक ठरणार राजकीय चाल …
महापालिकेच्या विद्यमान सदस्यांची मुदत १४ मार्च रोजी संपत आहे. महापालिकेची निवडणुक लांबणीवर पडली आहे. त्यातच महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडूनही २०२२ – २३ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मुख्य सभेला (PMC General Boddy Meeting) सादर करण्यास उशीर झाला आहे. महापालिका आयुक्त ७ मार्च रोजी प्रशासनाचे अंदाजपत्रक मुख्यसभेला सादर करणार आहे. यानंतर स्थायी समितीचे अंदाजपत्रक (Standing Committee Budget) तयार करून ते मुख्यसभेला सादर केले जाईल. परंतु, या सभागृहाची मुदत १४ मार्च रोजी संपत असल्याने हेमंत रासने यांना चौथ्यांदा अंदाजपत्रक सादर करण्याची संधी मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, स्थायी समितीचे अंदाजपत्रक १४ मार्चपुर्वी तयार करून त्यास मुख्यसभेची मान्यता घेण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून (Ruling BJP) प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रासने यांना पुन्हा संधी मिळणार ?
स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नव्याने निवड केली गेली आहे. यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवड पुन्हा करावी लागणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. विभागीय आयुक्तांनी हा कार्यक्रम मुदतीत जाहीर केला तर रासने (Hemant Rasne) यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. या विद्यमान समितीची २८ फेब्रुवारी पुर्वी एक बैठक होऊ शकते. त्यानंतर आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर आणखी एक बैठक होऊ शकते. या बैठकीत निश्चितच राजकारण रंगणार आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | New appointments to the 8 vacant posts of the PMC Standing Committee

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 54 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kaviya Maran | हैदराबादची मालकिण काविया मारन खूष ! 10 कोटी मोजलेल्या ‘त्या’ खेळाडूने दाखवला ‘ट्रेलर’, IPL मध्ये पाहायला मिळणार खरा ‘पिक्चर’?

Rice Production | भारतात तांदळाचे विक्रमी उत्पादन, बासमती तांदळाचे भाव वधारले

 

Related Posts