IMPIMP

Pune Municipal Corporation (PMC) | कोट्यवधीं खर्चून हॉस्पीटल उभारणीचे स्वप्न दाखविणारी महापालिका 3-4 कोटी खर्चून स्वत:ची RTPCR लॅब उभारू शकली नाही; ‘कोरोना’च्या लाटेत स्वॅब टेस्टिंगवर केला कोट्यवधींचा खर्च

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे – सरकारसत्ता ऑनलाइनPune Municipal Corporation (PMC) | संसर्गजन्य रोगांच्या साथीमध्ये सर्वस्वी ‘शासकिय’ लॅबवर (Government Testing Lab) अवलंबून असणार्‍या पुणे महापालिकेने दोन वर्षांच्या कोरोनाच्या साथीमध्ये (Coronavirus Pandemic) अवघी अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करून स्वत:ची लॅब उभारण्याकडे जाणीव पूर्वक डोळेझाक केल्याचे निदर्शनास येत आहे. मागील दोन वर्षात पालिकेने तब्बल 44 लाख 70 हजार नागरिकांचे ‘स्वॅब’ घेतले (Swab Test In Pune) असून यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. Pune Municipal Corporation (PMC)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

पुणे शहरात साधारण दहा वर्षांपुर्वी शहरात स्वाईन फ्लूच्या साथीने (Swine Flu In Pune) थैमान घातले होते. तर मागील दोन वर्षांपासून शहरात कोरोना ठाण मांडून आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे असलेल्या तब्बल 44 लाख 70 हजार नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुळे 6 लाख 59 हजार 500 पुणेकर बाधित झाले असून 9 हजार 338 जणांचा बळी गेला आहे. मृतांची संख्या धक्कादायक असून कोरोनातून बचावलेले अनेकांना मात्र अन्य व्याधींनी कायमचे ग्रासल्याचे पाहायला मिळत आहे. Pune Municipal Corporation (PMC)

 

 

कोरोनाच्या साथीमध्ये महापालिकेच्या विविध केंद्रांवर घेण्यात येणारे संशयितांचे स्वॅब एनआयव्ही National Institute of Virology (NIV) आणि ससून रुग्णालयातील लॅबमध्ये (Sasoon Hospital Lab) तपासण्यात येतात. तर शहरातील विविध खाजगी लॅबमध्येही कोरोनाची तपासणी (Private Covid Testing Labs In Pune) करण्यात येत आहे. परंतू सुरूवातीच्या काळापासूनच महापालिकेने राबविलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सारख्या उपाययोजनांमुळे ७५ टक्क्यांहून अधिक तपासण्या या ससून आणि एनआयव्हीच्याच लॅबमध्ये करण्यात आल्या आहेत. पुण्यासह जिल्ह्यातून व अन्य शहर आणि राज्यातून येत असलेल्या स्वॅब सॅम्पल्समुळे तपासण्यांचा भार या दोनच लॅबवर अधिक राहील्याने अगदी दोन ते तीन दिवसांनी रिपोर्टस् मिळत होते. कोरोना रिपोर्टस् मिळण्यास विलंब होत असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढण्यास एकप्रकारे हातभारच लागला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही बाब लक्षात आल्याने महापालिकेने स्वॅबसोबतच सौम्य लक्षणे असलेल्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधील संशयितांची तपासणी करून ताबडतोब अहवाल देणारी अँटीजेन कीटस् खरेदी केले. या किटस् तसेच संबधित अन्य सामुग्रीवर पालिकेने १० कोटी रुपयांहून अधिक रक्कम आतापर्यंत खर्च केली आहे. परंतू प्लेग, सार्स, स्वाईन फ्लू आणि कोरोना यासारख्या साथींचा अनुभव आलेल्या आणि हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची मुहुर्तमेढ रोवणार्‍या पालिकेने जेमतेम अडीच ते तीन कोटी रुपये खर्च असलेली स्वत:ची एकही लॅब उभारली नाही. किंबहुना प्रशासकिय आणि राजकिय पातळीवरही स्वत:ची लॅब असावी, असा पुसटसा उल्लेखही कधी चर्चेत केला नाही याबाबत संशय निर्माण झाला आहे.

 

 

कुशल मनुष्यबळ नसल्याने लॅब सुरू केली नाही

पुणे महापालिकेच्या केंद्रांवर गोळा करण्यात आलेल्या स्वॅबची तपासणी ससून आणि एनआयव्हीच्या लॅबमध्येच करण्यात येते.
तसेच पालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अँटीजेन कीटसचाही वापर केला आहे.
यासाठी आतापर्यंत दहा कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
लॅब चालविण्यासाठी महापालिकेकडे कुशल मनुष्यबळ नसल्याने ती सुरू करण्यात आली नाही.

– डॉ. संजीव वावरे, सह आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका ( Dr. Sanjeev Wavre, Co-Head of Health, Pune Municipal Corporation)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मनुष्यबळ नाही तर हजारो कोटी खर्चून रुग्णालयांची उभारणी कोणासाठी?

मनुष्यबळ नसल्याने महापालिकेची प्राथमिक रुग्णालये आणि ओपीडींमध्ये पुरेशी सेवा देण्यात अडचणी आहेत. अशातच महापालिकेने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर युद्धपातळीवर बाणेर येथे ५०० हून अधिक बेडस्ची दोन मोठी रुग्णालये उभारली. येरवडा येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय अत्ययावध केले. बाणेरमधील एक रुग्णालय खाजगी संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. तर दुसर्‍या हॉस्पीटलचा अद्याप वापर सुरू करण्यात आलेला नाही. अशातच एक हजार कोटी रुपये खर्चून वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल (Warje Multispeciality Hospital) तर बाणेर येथे कॅन्सर हॉस्पीटल (Baner Cancer Hospital) उभारून ते खाजगी संस्थेच्या माध्यमातून चालविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
असे असताना जेमतेम तीन ते चार कोटी रुपये खर्चून खाजगी संस्थांच्या माध्यमातून स्वत:ची लॅब चालविण्याचा निर्णय सत्ताधारी आणि प्रशासनालाही का शक्य झाला नाही? याबाबत संशय व्यक्त करण्यात येउ लागला आहे.

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | The corporation, which dreamed of building a hospital at a cost of crores, could not set up its own RTPCR lab at a cost of 3-4 crores; Billions spent on swab testing in the wake of Corona

 

हे देखील वाचा :

TET Exam Scam | पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! बनावट प्रमाणपत्रांव्दारे केलं पास; 650 बोगस प्रमाणपत्रे जप्त

Corporator Tushar Kamathe | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला तिसरा झटका ! नगरसेवक तुषार कामठे यांचा राजीनामा

BJP Mohit Kamboj | भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल; नवाब मलिकांच्या अटकेनंतर केलेलं कृत्य पडलं महागात

Nawab Malik | ‘फडणवीस दाम्पत्यांविरुद्ध 3 वर्षापूर्वीच ईडीकडे तक्रार, पण अद्याप…’

 

Related Posts