IMPIMP

TET Exam Scam | पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! बनावट प्रमाणपत्रांव्दारे केलं पास; 650 बोगस प्रमाणपत्रे जप्त

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन TET Exam Scam | टीईटी गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत
आहेत. राज्य परीक्षा परीषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे (State Examination Council President Tukaram Supe) याने इतरांसोबत संगनमत करुन
निकाल लागल्यावर अनेकांना बनावट प्रमाणपत्र (Fake Certificates) देऊन त्यांना पास केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत
2019 – 20 ची 400 आणि 2018 च्या परिक्षेतील 250 अशी एकूण 650 बनावट प्रमाणपत्र जप्त केली आहेत. तुकाराम सुपे याने यासर्वांना बनावट
प्रमाणपत्र देऊन परीक्षा मध्ये पास झाल्याचे दाखवले होते.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

टीईटी परीक्षेमध्ये (TET Exam Scam) तुकाराम सुपे, डॉ. प्रीतीश देशमुख (Dr. Pritish Deshmukh), अश्विनकुमार (Ashwin Kumar) यांनी एजंटांना हाताशी धरुन हजारो अपात्र परीक्षार्थींकडून (Ineligible Candidate) कोट्यावधी रुपये घेऊन त्यांना पात्र करुन घेतले. मुळ निकालामध्ये त्यांची नावे समाविष्ट केली. एवढेच नाही तर निकाल लावल्यानंतर सुपे याच्याकडे आलेल्या यादीतील परीक्षार्थींना पात्र ठरवून त्यांना बनावट प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. तसेच अनेकांना त्यांची बनावट प्रमाणपत्रांची फोटो कॉपी काढून पोस्टांनी पाठवून दिल्याचे समोर आले आहे.

 

बोगस प्रमाणपत्राबाबत सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) केलेल्या तपासात 45 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच 203 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा पुरावा मिळाला आहे. तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) व एजंटांकडून 81 बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत. जी ए सॉफ्टवेअर (GA Software) जप्त डिजिटल पुराव्याची पडताळणी सध्या सुरु आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांनी सांगितले की,
टीईटी परीक्षेत आरोपींनी परीक्षेचा निकाल लावल्यानंतर अनेक अपात्र परीक्षार्थींना बनावट प्रमाणपत्र दिली आहेत.
शिक्षण विभागाने सर्वांकडून ही प्रमाणपत्रे मागवली आहेत.
आजपर्यंत 650 जणांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तपासात समोर आले असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- TET Exam Scam | tet exam scam pass made by giving fake certificates 650 bogus certificates confiscated Pune Cyber Police

 

हे देखील वाचा :

Corporator Tushar Kamathe | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला तिसरा झटका ! नगरसेवक तुषार कामठे यांचा राजीनामा

BJP Mohit Kamboj | भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल; नवाब मलिकांच्या अटकेनंतर केलेलं कृत्य पडलं महागात

Nawab Malik | ‘फडणवीस दाम्पत्यांविरुद्ध 3 वर्षापूर्वीच ईडीकडे तक्रार, पण अद्याप…’

Pune Crime | पत्नीला नांदविण्यासाठी आणायला गेलेल्या पतीला मेव्हण्यांनी केली बेदम मारहाण; खडकीतील अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी परिसरातील घटना

 

Related Posts