IMPIMP

Pune Municipal Election 2022 | पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग जाहीर; जाणून घ्या नावे

Pune Municipal Election 2022 | Prabhag-Wards of seats reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes for Pune Municipal Corporation elections 2022 announced; Know the names

पुणे : सरकारसत्ता  ऑनलाइन – Pune Municipal Election 2022 | सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर निवडणूक आयोग राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या (Maharashtra Local Body Elections) कामाला लागले आहे. त्यामुळे आतापर्यंत 14 महापालिकेंचा प्रभाग रचना तयार झाली असल्याचे आयोगाने सांगितलं. दरम्यान पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (Pune Municipal Election 2022) अनुसूचित जाती (Scheduled Castes) आणि अनुसूचित जमातींसाठी (Scheduled Tribes) आरक्षित जागांचे प्रभाग (PMC Wards of Reserved Seats) जाहीर करण्यात आले आहे. (PMC Election 2022)

 

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (Pune Municipal Election-2022) एकूण 173 जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातींसाठी 23 तर अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव आहेत. त्यासाठीच्या लोकसंख्यानिहाय याद्या आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 25 प्रभाग राखीव असणार आहेत. 25 पैकी 13 जागा या महिलांसाठी राखीव असणार असून त्यामध्ये 12 जागा अनुसूचित जाती महिला तर 1 जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी असणार आहे. तसेच, महिलांसाठीच्या आरक्षणाची सोडत स्वतंत्रपणे काढली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. Pune Municipal Corporation (PMC)

 

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी आयोगाने पुणे शहराची 2011 ची 35 लाख 56 हजार 824 इतकी लोकसंख्या गृहीत धरली आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या चार लाख 80 हजार 17 आहे. तसेच, अनुसूचित जमातींची लोकसंख्या 41 हजार 561 आहे. यावरुन लोकसंख्या गृहीत धरून हे आरक्षित प्रभाग स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

अनुसूचित जातीसाठी (SC) आरक्षित प्रभाग –

 

  1. प्रभाग क्रमांक 1 – धानोरी- विश्रांतवाडी (Dhanori- Vishrantwadi Prabhag Ward)
  2. प्रभाग क्रमांक 3 – लोहगाव-विमाननगर (Lohegaon-Vimannagar Prabhag Ward)
  3. प्रभाग क्रमांक 4 – पूर्व खराडी-वाघोली (East Kharadi-Wagholi Prabhag Ward)
  4. प्रभाग क्रमांक 7 – कल्याणीनगर-नागपूर चाळ (Kalyaninagar-Nagpur Chawl Prabhag Ward)
  5. प्रभाग क्रमांक 8 – कळस-फुलेनगर (Kalas-Phulenagar Prabhag Ward)
  6. प्रभाग क्रमांक 9 – येरवडा (Yerawada Prabhag Ward)
  7. प्रभाग क्रमांक 10 – शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी (Shivajinagar Gaothan-Sangamwadi Prabhag Ward)
  8. प्रभाग क्रमांक 11 – बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Bopodi-Savitribai Phule Pune University Prabhag Ward)
  9. प्रभाग क्रमांक 12 – औंध-बालेवाडी (Aundh-Balewadi Prabhag Ward)
  10. प्रभाग क्रमांक 19 – छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम-रास्ता पेठ (Chhatrapati Shivaji Maharaj Stadium-Rasta Peth Prabhag Ward)
  11. प्रभाग क्रमांक 20 – पुणे स्टेशन- मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता (Pune Station – Matoshri Ramabai Ambedkar Road Prabhag Ward)
  12. प्रभाग क्रमांक 21 – कोरेगाव पार्क-मुंढवा (Koregaon Park-Mundhwa Prabhag Ward)
  13. प्रभाग क्रमांक 22 – मांजरी -शेवाळेवाडी (Manjari -Shewalewadi Prabhag Ward)
  14. प्रभाग क्रमांक 26 – वानवडी गावठाण-वैदुवाडी (Wanwadi Gaothan-Vaiduwadi Prabhag Ward)
  15. प्रभाग क्रमांक 27 – कासेवाडी-लोहियानगर (Kasewadi-Lohianagar Prabhag Ward)
  16. प्रभाग क्रमांक 37 – जनता वसाहत-दत्तवाडी (Janata Vasahat-Dattawadi Prabhag Ward)
  17. प्रभाग क्रमांक 38 – शिवदर्शन-पद्मावती (Shivdarshan-Padmavati Prabhag Ward)
  18. प्रभाग क्रमांक 39 – मार्केट यार्ड- महर्षीनगर (Market Yard – Maharshinagar Prabhag Ward)
  19. प्रभाग क्रमांक 42 – रामटेकडी-सय्यद नगर (Ramtekdi-Sayyed Nagar Prabhag Ward)
  20. प्रभाग क्रमांक 46 – महंमदवाडी-उरूळी देवाची (Mahammadwadi-Uruli Devachi Prabhag Ward)
  21. प्रभाग क्रमांक 47 – कोंढवा बु.- येवलेवाडी (Kondhwa Bu.- Yeolawadi Prabhag Ward)
  22. प्रभाग क्रमांक 48 – अप्पर- सुपर इंदिरानगर (Upper- Super Indiranagar Prabhag Ward)
  23. प्रभाग क्रमांक 50 – सहकारनगर-तळजाई (Sahakarnagar-Taljai Prabhag Ward)

 

अनुसूचित जमातीसाठी (ST) आरक्षित प्रभाग –

 

प्रभाग क्रमांक 1 – धानोरी- विश्रांतवाडी (Dhanori- Vishrantwadi Prabhag Ward)

प्रभाग क्रमांक 14 – पाषाण-बावधन बुद्रुक (Pashan-bavadhan budruk Prabhag Ward)

Web Title :- Pune Municipal Election 2022 | Prabhag-Wards of seats reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes for Pune Municipal Corporation elections 2022 announced; Know the names

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Updates | आगामी 2 ते 3 दिवसांत मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार – IMD

Arthritis Causes And Prevention | ‘या’ गोष्टींमुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात, तुम्ही ‘या’ गोष्टींचं अधिक सेवन तर करत नाहीत ना?

Gujarat Sagar Salt Factory Wall Collapse | ‘सागर सॉल्ट’ची भिंत कोसळून मोठी दुर्घटना; 12 मजुरांचा मृत्यू