IMPIMP

Pune News | मी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना नम्रपणे विनंती करते की….(व्हिडीओ)

by nagesh
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) : Pune News | कोरोना काळात लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची परवड होत आहे. मुख्यमंत्र्यांचं घराणं हे कलाकारांचं घराणं आहे त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात तसेच कलाकारांना मासिक मानधन सुरु करण्याची नम्र विनंती लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Lavni Samrath Gini Surekha Punekar) यांनी मुख्यमंत्र्याना केली आहे. गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप कार्यक्रमात सुरेखा पुणेकर (Pune News) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

लावणी, सांगीतिक कार्यक्रम तसेच चित्रपट, मालिका निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलणाऱ्या अशा हजारो तंत्रज्ञ, कामगारांसारख्या पडद्यामागील कलाकारांचे जगणे लॉकडाउनने मुश्कील झाल्याचे वास्तव आहे. स्पॉटबॉय, सेटिंग बॉय, लाइटमन, ग्रीसमन, साउंड असिस्टंट, साउंड रेकॉर्डीस्ट, कॉश्‍युम असिस्टंट, आर्ट असिस्टंट, मेकअप असिस्टंट, हेअर ड्रेसर यांसारख्या हजारो कष्टकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. कोरोनामुळे नाट्यसृष्टीवरही अवकळा पसरली आहे. कलाकारांसोबतच नृत्यकलाकार, तंत्रज्ञ यांच्यावरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे अनेक नृत्य कलाकार आणि तंत्रज्ञांनी अन्य मार्गाचा अवलंब करत स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार, नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्ददर्शक, आणि तंत्रज्ञांची ससेहोलपट सुरू आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी हे सर्व कलाकार आपापल्यापरिने प्रयत्न करत आहेत. त्यातच सुरश्री प्रोडक्शनच्या माध्यमातून आम्ही २०० गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप करत असल्याचे सुरेखा पुणेकर (Lavni Samrath Gini Surekha Punekar) म्हणाल्या.

 

 

यावेळी बाळासाहेब दाभेकर (balasaheb.dabhekar), अशोक पुणेकर (Ashok Punekar), शिवसंग्राम पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil), मनोज पुणेकर (Manoj Punekar) उपस्थित होते.

 

 

Web Title : Pune News | Lavani samrath gini Surekha Punekar’s humble request to Chief Minister Uddhavji Thackeray that …. (Video)

 

हे देखील वाचा :

Maharashtra Flood | कोकण पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन; शिवराजमुद्रा प्रतिष्ठानकडून पाण्याच्या मोटर रवाना

Pune News | नियोजित स्मारकाचे जागेत साजरी होणार अण्णा भाऊ साठेंचे जयंती; झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पाठपुराव्याला यश

Pune News | ‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’; स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात !

 

Related Posts