IMPIMP

Pune News | लहू बालवडकरांनी आयोजित केलेला पादुका दर्शन सोहळा म्हणजे अनंत-अनंदाची प्राप्ती; कालीचरण महाराजांचे गौरोद्गार

by bali123
Pune News | The Paduka Darshan ceremony organized by Lahu Balwadkar is the attainment of eternal bliss; Gaurodgar of Kalicharan Maharaj

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune News | देवाच्या गाभाऱ्यात गेले की लोक नानाविध प्रकारच्या गोष्टी मागतात. बायको दे, नवरा दे, गाडी दे, घोडी दे, नोकरी दे, छोकरी दे, अशा पद्धतीच्या मागण्या केल्या जातात. परंतू, मोक्ष प्राप्तीसाठी हे धर्माचे टार्गेट नाही. थोडे प्रयत्न केले तरी हे सहज रित्या मिळून जाते. धर्माचे असली टार्गेट आहे, अनंत आनंदाची प्राप्ती करणे, जे संत लोक शिकवतात. म्हणून या ठिकाणी संत पुजनाचा, दर्शनाचा सोहळा लहूजींनी भव्य-दिव्य स्वरूपातून आयोजित केला आहे. असा सोहळा आयोजित केला पाहिजे, असे गौरोद्गार कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी (Pune News) काढले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

 

 

 

लहू बालवडकर (Lahu Balwadkar) सोशल वेलफेअरच्या वतीने भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा अभूतपुर्व सोहळा पार पडला. शुक्रावारी (दि. १९) भाजप सदस्य लहू बालवडकर यांच्या पुढाकाराने पुण्यातील बालेवाडी (Balewadi, Pune) परिसरातील गेनबा सोपानराव मोझे कॉलेजच्या मैदानात भक्तांसाठी पादुका दर्शनाचा सोहळा पार पडला. यावेळी कालीचरण महाराजांच्या हस्ते सायंकाळची महाआरती करण्यात आली. त्यावेळी ते भाविकांना संबोधित करत होते. यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे धनंजय भाई देसाई, विश्व हिंदू परिषदेचे दादाजी वेदर, राजेश पांडे, महंत पुरुषोत्तम पाटील पुनीत जोशी, सोमनाथ पाडळे, जांभुळकर महाराज, ईश्वरबापू महाराज, पपू चांदीरे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, नगरसेवक अमोल बालवडकर, मोरेश्वर भोंडवे, तुषार कामठे, नामदेव डाके, नगरसेविका झामाताई बारणे, ज्योती कळमकर, ज्ञानेश्वर तापकीर, विनायक गायकवाड, सरपंच नारायण चांदेरे, नामदेव गोलाडे, A C P लक्ष्मण बोराटे, सामाजिक कार्यक्रते बाबासाहेब बोडके, बालेवाडी, बाणेर, सुस, महाळुगे गावातील सर्व नागरीक उपस्थित होते.

कालीचरण महाराज म्हणाले, लहू बालवडकरांनी २०२० रोजीही अशाच प्रकारचे आयोजन केले होते. पादुका दर्शन सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. त्याच बरोबर आगामी महापालिका निवडणूकी जवळ आल्या असून लहूजींची निवडणूकीसाठी जय्यत तयारी चालू (Pune News) आहे. कायम तुम्ही नागरिकांना देव दर्शन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांची सेवा करा, हेच लोक तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीत. तुमच्या सर्व राजकीय इच्छा पुर्ण होतील, आगामी महापालिका निवडणूकीत तुम्हाला नक्कीच यश मिळेल, असे त्यांनी सांगितले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

 

 

पुढे बोलताना ते म्हणाले, माणसाला मिळालेले शरीर हे ७०-८० वर्षानंतर विसटले जाईल. त्यानंतर पुन्हा नवीन शरीर मिळेल. जन्म-मृत्यू ही प्रक्रीया मोक्ष प्राप्तीपर्यंत वारंवार चालत राहील. धर्माची धारण व्हावी, यासाठी माणूस देवाच्या गाभाऱ्यात वारंवार हे दे, ते दे, नोकरी दे छोकरी दे, अमूक-तमूक गोष्टी मागत असतो. परंतू, धर्माचे खरे टार्गेट ह्या गोष्टी नाहीत तर अनंतप्राप्ती आहे. धर्म धारण करणे आहे. अनेकांना प्रश्न पडतो धर्माची धारणा केल्यावर काय होईल? अंतिम परिणाम काय आहे?,

धर्माची धारणा झाल्यावर सर्वप्रकारच्या दु:खातून तुम्ही मुक्त व्हाल. अनंत-आनंदाची प्राप्ती होईल,
अनंत-आनंदाची प्राप्ती म्हणजे, ईश्वराची प्राप्ती होईल. आणि एकदा तुम्हाला ईश्वराचा साक्षात्कार झाला की,
क्षणा-क्षणाला, जिकडे-तिकडे चौहीकडे तुम्हाला ईश्वर दिसायला लागेल.
त्यामुळे धर्माचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य आहे.
त्यासाठी लहूजींनी भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा सोहळा आयोजित केला आहे.
त्यांचे मनापासून धन्यवाद, अशाच कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे, असेही कालीचरण महाराज यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title :- Pune News | The Paduka Darshan ceremony organized by Lahu Balwadkar is the attainment of eternal bliss; Gaurodgar of Kalicharan Maharaj

 

Related Posts