IMPIMP

Pune News | योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध ! दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – मोहन जोशी

by nagesh
Former MLA Mohan Joshi | After 5 years in office, Pune went to the pits; BJP delegation's visit is a mere stunt - Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांना उत्तर प्रदेशातील भ्याड योगी आदित्यनाथ सरकारने (yogi adityanath government) पोलीसांकरवी ताब्यात घेतले ही कृती अत्यंत निषेधार्ह असून दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी दिला (Pune News)आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

उत्तर प्रदेशातील लखीमपूर (lakhimpur kheri) येथे आंदोलक शेतकऱ्यांवर रविवारी गोळीबार करण्यात आला, त्यात १० जण मृत्यूमुखी पडले.
मोदी सरकारच्या अन्याय्य कृषी कायद्याच्या विरोधात गेले काही महिने शांततेच्या मार्गाने शेतकरी लढा देत आहेत. पोलीसी बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न योगी सरकारने चालविला आहे.
गोळीबारात् बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आणि आंदोलक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंकाजी गांधी लखीमपूरला जाणार होत्या.
परन्तु योगी सरकारने त्यांना पोलीसांमार्फत ताब्यात घेऊन रोखले. ही कृती भ्याडपणाची आहे. अशा दडपशाहीपुढे प्रियंकाजी झुकणार नाहीत याची खात्री आहे.
आणि देशातील सर्व काँग्रेसजन त्यांच्या पाठिशी आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

काँग्रेस पक्षांचे मुख्य मंत्री, नेते तसेच अन्य पक्षाच्या नेत्यांना लखीमपूरमध्ये प्रवेशासाठी प्रतिबंध केला जात आहे, ही बाबही संतापजनक असल्याचे जोशी यांनी म्हटले (Pune News) आहे.

 

Web Title : Pune News | Yogi government doing wrong things ! People’s voice cannot be suppressed by repression – Mohan Joshi

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | पुण्यातील महिलेचे बँक खाते झाले रिकामे; मेसेजवर संपर्क साधणे पडले महागात

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांबद्दल आम्हाला तसं काहीच म्हणायचं नाही – शिवसेना

Pune Crime | पुण्यात लोहगावमधील दोन कुटुंबामध्ये भररस्त्यात ‘राडा’ ! परस्पराविरोधात विनयभंगाच्या तक्रारी करणार्‍या 12 जणांना अटक, कारण ऐकून तुम्ही व्हाल ‘चकीत’

 

Related Posts